पुणे- राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि इंदापूरचे आमदार दत्ता भरणे यांचा एक व्हिडिओ शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये दत्ता भरणे शिवीगाळ आणि धमकी देत असल्याचं पाहायला मिळालं होतं. याप्रकरणी आता दत्ता भरणे यांच्या विरोधात सुप्रिया सुळे यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.
रोहित पवार यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केलेला व्हिडिओ कधीचा आणि कुठला आहे, याबाबत नेमकं समजू शकलेलं नाही. मात्र, हा व्हिडिओ आजचा असून मतदारांना धमकावले जात असल्याचा दावा शरद पवार गटाकडून करण्यात आला आहे. सुप्रिया सुळे यांनी निवडणूक आयोगाच्या व्हॉट्सअप क्रमांक आणि ई-मेल आयडीवर मेल करुन रितसर तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दत्ता भरणे यांनी सुप्रिया सुळे यांच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ केली आहे. सुप्रिया सुळे यांनी नाना गवळी यांची तात्काळ जाऊन भेट घेतली आहे. यावेळी गवळी म्हणालेत की, 'आमचे कार्यकर्ते बसले होते. त्यावेळी भरणे गाडीतून आले आणि त्यांनी शिवीगाळ सुरु केली. तुम्हाला माझ्याशिवाय कोणी नाही. तुम्हाला इथंच राहायचं आहे. आम्ही सुळे गटाचे असल्याने त्यांनी आम्हाला शिवीगाळ केली.'
दत्ता भरणे यांचे हे शिवीगाळ प्रकरण चांगलंच गाजण्याची शक्यता आहे. अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. विरोधकांकडून खोटे आरोप करण्यात आले आहे. समोरच्याच व्यक्तीने शिवीगाळ केली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून शिवीगाळ करावी लागली, असं ते म्हणाले आहेत. दरम्यान, आज राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मदतान पार पडत आहे. राज्यातील ११ मतदारसंघात मतदान होत आहे. यात बारामती लोकसभा मतदारसंघाचा देखील समावेश आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असणार आहे.
शरद पवार यांनी देखील इंदापूर येथील सभेत बोलताना दमदाटी करणाऱ्यांना जागा दाखवा असा इशारा दिला होता. त्यांनी थेट दत्ता मामा भरणे यांना इशारा दिला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.