विमाननगर : बीआरटीत इतर वाहनांची घुसखोरी

नगर रस्ता, वाहतूक पोलिसांसमोर कारवाईचे आव्हान
नगर रस्ता : बीआरटी मार्गात इतर वाहनांची घुसखोरी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
नगर रस्ता : बीआरटी मार्गात इतर वाहनांची घुसखोरी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.sakal
Updated on

विमाननगर : बीआरटी मार्गातील इतर वाहनांची घुसखोरी रोखण्यासाठी नेमलेले सुरक्षारक्षक लॉकडाऊन नंतर अजूनही नियुक्त करण्यात आलेले नाहीत. वाहनांच्या घुसखोरीमुळे प्रवाशांची सुरक्षाही धोक्यात आली आहे. अशा वाहनांवर कारवाई करण्याचे मोठे आव्हान त्यामुळे वाहतूक पोलिसांसमोर आहे. नगर रस्त्यावर येरवडा ते खराडी पर्यंत बीआरटी मार्गाची आखणी करण्यात आलेली आहे. मेट्रो कामामुळे येरवडा ते विमान नगर चौक पर्यंतचा बीआरटी मार्ग बंद आहे. तर सुरू असलेल्या विमाननगर चौक ते खराडी पर्यंतच्या बीआरटी मार्गातच इतर वाहनांची सर्वाधिक घुसखोरी होताना दिसून येते.

अनेकदा खाजगी वाहनांमुळे बसलाच जायला जागा शिल्लक राहत नाही. त्यामुळे पीएमपीएल बस वाहतूक कोंडीत अडकल्याचे अनेकदा दिसून येते. ज्या ठिकाणी बीआरटी मार्ग सुरू होतो तेथे सुरक्षा चिन्ह आणि सूचनाफलक योग्य प्रमाणात आणि दिसतील अशाप्रकारे लावलेले नसल्यामुळे वाहनचालकांमध्ये गोंधळ उडतो. खराडी दर्गा परिसरात वाहतूक कोंडीतून सुटका करून घेण्यासाठी अनेक वाहनचालक बीआरटी मार्गात घुसखोरी करतात.

बीआरटी थांब्याकडे प्रवासी ये-जा करताना अशा घुसखोर वाहनांमुळे अपघाताची शक्‍यता बळावते. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक आणि बीआरटी मार्गातील वाहनांमधून धोकादायक पद्धतीने प्रवाशांना रस्ता ओलांडावा लागतो. विमाननगर चौकात तर बीआरटी मार्गाच्या समोरच खाजगी वाहने पीएमपीएल बसचा रस्ता अडवून उभी राहतात. वाहनांच्या घुसखोरीमुळे अलीकडच्या काळात काही मोठे अपघात याठिकाणी घडले आहेत. पंधरा दिवसापूर्वी बीआरटी मार्गात बसला दुचाकी धडकून दोन युवकाना जीव गमवावा लागला. अशीच घटना वर्षभरापूर्वी खराडी येथे सुद्धा घडली होती.

मेट्रो कामामुळे नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी वाढली आहे. गरज नसताना बीआरटी मार्ग येरवडा ते रामवाडी पर्यंत बंद करण्यात आलेला आहे. त्यामुळे बस कधी बीआरटी मार्गातून जाते तर कधी बीआरटी मार्गाच्या बाहेरून जाते. यामुळे वाहनचालकांमध्ये संभ्रम वाढतो. मेट्रोचे काम होईपर्यंत बीआरटी मार्ग सर्व वाहनांसाठी खुला करावा. तसेच वाहतूक पोलिसांनी घुसखोरी करणाऱ्या वाहनांवर कारवाई करावी.

- अरिहंत पाटील (प्रवासी)

बीआरटी मार्गात घुसखोरी करणाऱ्या वाहनांवर नियमित कारवाई सुरू असते. पादचाऱ्यांसाठी झेब्रा क्रॉसिंग पट्टे रंगवणे तसेच बीआरटी मार्गात जागोजागी सूचना देणारे फलक आणि वाहतूक नियंत्रण दिवे लावण्याच्या सूचना आम्ही पुणे महापालिकेला केलेल्या आहेत. यापुढेही बीआरटी मार्गातील घुसखोरी करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येणार आहे.

- अजित लकडे ,पोलीस निरीक्षक, विमानतळ वाहतूक विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.