विमाननगर रोड भागात भटक्या कुत्र्यांची दहशत

भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्त करावा अशी मागणी
The terror of dogs
The terror of dogssakal
Updated on

पुणे : चंदननगर विमाननगर कल्याणीनगर खराडी आणि वडगावशेरीकर सध्या कुत्ता गॅंगच्या दहशती खाली वावरत आहे. दिवसभरात किमान पाच ते सात जण पालिकेच्या रुग्णालयात अँटीरेबीज इंजेक्शन साठी धाव घेत आहे. भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्त करावा अशी मागणी कल्पना भागवत सह अनेक नागरिकांकडून केली जात आहे.

The terror of dogs
नागपूर : कोळसा टंचाईने उद्योग अडचणीत

भटके कुत्रे कधी कधी पादचाऱ्यांच्या अंगावर धावून जातात. तर कधी दुचाकीस्वारांचा पाठलाग करत असतात.अचानक होणाऱ्या हल्ल्यांमुळे दुचाकीस्वारांना अपघातां लां सामोरे जावे लागत आहे. परिसरात कुत्र्यांनी अनेकांना चावा घेतल्याने भीतीचे वातावरण आहे. ही कुत्री टोळक्याने फिरतात त्यांना पाहून पादचारी भीतीने आपला मार्ग बदलतात. लहान मुले भीतीने पळतात अशा वेळी ही कुत्रे त्यांचा पाठलाग करून त्यांच्यावर हल्ले करतात. कुत्र्यांना पकडण्यासाठी महापालिकेचे गाडी येथे मात्र श्वानप्रेमी कडून कर्मचाऱ्यांना विरोध केला जात असल्याने कारवाईत अडथळा निर्माण होत असल्याचे पालिकेच्याअधिकार्‍यां कडून सांगण्यात आले. प्रशासनाकडून दरवर्षी कुत्र्याच्या वाढत्या संख्येवर आळा बसावा यासाठी निबीर्जीकरण शस्त्रक्रिया केली जात असली तरी ही मोहिम यशस्वी होताना दिसत नाही. कुत्र्यांवर शस्त्रक्रिया केली जाते परंतु वाढत्या वयातल्या कुत्र्याकडे प्रशासन कडून दुर्लक्ष होताना दिसत आहे. त्यामुळे भटक्या कुत्र्या संख्येत वाढ होत आहे. प्रशासनाने भटक्या कुत्र्यां वर योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

The terror of dogs
Under 19 : किराणा दुकानदाराचा मुलगा सिद्धार्थने केले वडिलांचे स्वप्न साकार

"भटक्या कुत्र्यांच्या टोळी एकत्र फिरतात. गाड्या मागे धावतात परिसरात अनेकांना चावले आहे. पालिकेकडून कुत्र्यांच्या नसबंदी वर दरवर्षी लाखो रुपये खर्च करून ही परिसरात कुत्र्यांची संख्या वाढतच आहे." - कल्पना भागवत (रहिवासी)

"महापालिकेच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात कुत्र्यांवर शस्त्रक्रिया करून पाच दिवस त्यांना दवाखान्यात ठेवले जाते. त्याच बरोबर अँटीरेबीज लस दिली जाते. ज्या ठिकाणाहून कुत्र्यांना आणले जाते त्या ठिकाणी परत सोडले जाते." - डॉ. आशीष भारती - आरोग्य प्रमुख, पुणे महानगरपालिका

The terror of dogs
पुणे : शिवसेना नगरसेवकांची विकासकामे इतरांपेक्षा सरस; आढळराव

(1 डिसेंबर ते 20 डिसेंबर 2021 पर्यत पालिकेच्या रुग्णालयात कुत्रा चावल्याने नवीन व जुने असे एकूण 356 जणांना अँटीरेबीज इंजेक्शन देण्यात आल्याचे पालिकेच्या डॉक्टर कडून सांगण्यात आले.)

अँटीरेबीज इंजेक्शन घेतलेल्या नागरिकांच्या संख्या

मातोश्री मीनाताई ठाकरे रुग्णालय वडगावशेरी - 96

पुणे महानगरपालिका रुग्णालय खराडी - 134

कै. दामोदर गलांडे पाटील रुग्णालय शास्त्रीनगर - 126.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.