Ayurvedic Medicine : आयुर्वेदिक औषधाने जनुकीय विकृतीवर उपचार

पुण्यातील वैद्य विनीता बेंडाळे यांचा शोधनिबंध आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रसिद्ध
Vinita Bendale
Vinita Bendalesakal
Updated on

पुणे - पुरुषांमधील जनुकीय विकृतींवर आयुर्वेदिक चिकित्सेने यशस्वी उपचार करता येतात. पुरुषांच्या वंध्यत्वातील जनुकीय विकृतींमधील दोष दूर करण्यासाठी मानसिक आरोग्य, सात्त्विक आहार आणि योग्य जीवनशैली या त्रिसूत्रींसह आयुर्वेदिक औषधांचा गुणकारीपणा उपयुक्त ठरल्याचे संशोधन पुण्यातील वैद्यांनी केले आहे. त्यांचा हा शोधनिबंध ‘जर्नल ऑफ रिप्रॉडक्शन अँड इन्फर्टीलिटी’ या आंतरराष्ट्रीय वैद्यकीय नियतकालिकाने प्रकाशित केला आहे.

वंध्यत्व ही आधुनिक काळातील गंभीर समस्या आहे.जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार सहापैकी एका (१७.५ टक्के) दांपत्याला मूल होत नाही. मूल न होण्याच्या कारणांमध्ये पुरुषांमध्ये दोष असण्याचे प्रमाण साधारण २० ते ३५ टक्के असते. त्यातही शुक्रजंतूंमधील दोष हे प्रमुख कारण असते. त्यापैकी ‘स्पर्म डिएनए फ्रॅगमेंटेशन’ (एसडीएफ) ही अत्यंत गंभीर बाब समजली जाते.

अशा पुरुषांवर आधुनिक वैद्यकशास्त्रात ‘असिस्टेड रिप्रॉडक्टिव्ह टेक्नॉलॉजी’ (एआरटी) या पद्धतीने उपचार केले जातात. मात्र, काहींवर ही उपचारपद्धती निष्प्रभ ठरते. त्यामुळे या दांपत्यांना मूल होण्यात मोठा अडथळा ठरतो. अशा रुग्णांवर आयुर्वेदिक उपचार प्रभावी ठरत असल्याचे संशोधन पुण्यातील ‘द्युम्ना वूमेन्स क्लिनिक’च्या वैद्य विनिता बेंडाळे यांनी केले.

आंतरराष्ट्रीय नियतकालिकात हा शोधनिबंध प्रकाशित झाला. वैद्य श्री लक्ष्मी चागंटी, वैद्य ऋतुजा पांडव, वैद्य दीपाली पवार यांचाही या संशोधनात सहभाग आहे.

‘एसडीएफ’ची संभाव्य कारणे

  • मानसिक ताणतणाव

  • जंतुसंसर्ग

  • हवेच्या प्रदूषणाचा दुष्परिणाम

  • व्यसनाधीनता

‘एसडीएफ’मुळे काय होते?

  • शुक्राणूंच्या जनुकांचे विखंडन होते.

  • पुरुषांमधील वंध्यत्व वाढते.

  • नैसर्गिकपणे गर्भधारणा होण्यात अडथळा निर्माण होतो.

असे केले संशोधन

वयाची चाळीशी ओलांडलेल्या रुग्णाला ‘एसडीएफ’चे निदान झाले होते. आधुनिक वैद्यकीय उपचार प्रभावी ठरले नव्हते. त्यामुळे आयुर्वेदाच्या मदतीने उपचार करण्यासाठी रुग्ण ‘द्युम्ना वूमेन्स क्लिनिक’मधील वैद्य विनिता बेंडाळे यांच्याकडे आला. आयुर्वेदानुसार त्या रुग्णाचा संपूर्ण इतिहास जाणून घेतला. त्या आधारे आयुर्वेदाच्या सिद्धांतानुसार शुक्र धातूंमधील विकृतीवर चिकित्सा करून रसायन औषधे व बस्ती चिकित्सा दिली. प्रत्येक टप्प्यावर त्याच्या नोंदी ठेवल्या. चिकित्सा सुरू झाल्यानंतर चार महिन्यांनी पुन्हा केलेल्या वैद्यकीय चाचणीत ‘एसडीएफ’ दोष दूर झाल्याचे सिद्ध झाले.

वंध्यत्वावर चिकित्सा करत असताना रुग्णाच्या मानसिक स्थितीचाही विचार करून, आहार व जीवनशैलीमध्ये योग्य बदल केले, तर लवकर यश मिळणे सोपे जाते. महत्त्वाचे म्हणजे यासाठी वापरलेली आयुर्वेदिक औषधे संशोधनाच्या कसोटीवर तपासून सुरक्षित आहेत, हे सिद्ध झाले आहे.

- वैद्य विनिता बेंडाळे, ‘द्युम्ना वूमेन्स क्लिनिक’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.