विश्रांतवाडी - पुणे चहुबाजूंनी वाढते आहे. त्यामुळे पायाभूत सुविधा देताना प्रयत्नाची शिकस्त करावी लागते. वडगाव शेरी मतदारसंघात सर्वात जास्त विकासकामे चालू आहेत. वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी फ्लायओव्हर व ग्रेडसेपरेटरचा उपयोग होणार आहे. विमानतळाची ५०० कोटीची इमारत, नदी सुधार प्रकल्प, रिंगरोड हे सर्व प्रकल्प शहराच्या विकासात भर घालणार आहेत.
विरोधक उगाच सगळे गुजरातमध्ये गेले असे ओरडत असतात. पण असे काही नाही. जे महाराष्ट्राचे आहे ते महाराष्ट्रातच राहणार आहे. अजून विकास साधण्यासाठी व तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी जनतेने साथ द्यावी, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनी केले.
वडगाव शेरी मतदार संघाचे आमदार सुनील टिंगरे यांच्या प्रयत्नातून विश्रांतवाडी येथील मुकुंदराव आंबेडकर चौकामध्ये (विश्रांतवाडी जंक्शन) होणाऱ्या फ्लायओव्हर, ग्रेड सेपरेटर व मतदार संघातील अंदाजे 172 कोटी ३० लाख रुपये किमतीच्या विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा श्री. पवार यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी आमदार सुनील टिंगरे, पुणे महानगरपालिकेचे प्रशासक व आयुक्त विक्रमकुमार, अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, मुख्य अभियंता श्रीनिवास बोनाला, सतीश म्हस्के, शीतल सावंत, मीनल सरोदे, अलका खाडे, शशिकांत टिंगरे, राजेंद्र खांदवे, विनोद पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री. पवार पुढे म्हणाले की, पुणे हे विद्येचे माहेरघर आहे. ड्रग, कोयता गँगसारख्या गोष्टी इथे घडणे हे पुण्याच्या नावाला बट्टा लाग्ण्यासारख्या आहेत. यामुळे पालकांनी आपल्या मुलांवर चांगले संस्कार करावेत. नाहीतर चूक झाली, दादा मला पदरात घ्या म्हणतात. अशाना पदर नाही की धोतर नाही. डायरेक्ट टायरमध्ये घातले जाईल. महापुरुषांचा आदर्श समोर ठेवून चांगली कामे करा.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मनपा आयुक्त विक्रमकुमार यांनी सांगितले की या सर्व विकासकामांमुळे वाहतुकीची कोंडी सुटायला, पुणेकरांची इंधन व वेळेची बचत होईल. ही कामे पुढील २४ महिन्यांत पूर्ण होतील.
आमदार सुनील टिंगरे यांनी विविध विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री, व उपमुख्यमंत्री यांचे आभार मानले. तसेच मतदारसंघात चालू असलेल्या व प्रस्तावित असलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेतला.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी अधीक्षक अभियंता अभिजित डोंबे, कार्यकारी अभियंता अजय वायसे, जितेंद्र लवांदे, प्रकल्प तज्ज्ञसल्लागार पवन मापरी व रश्मी देशमुख यांचे लाभले. कार्यक्रमाचे आभार मनपाचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी मानले. कार्यक्रमाला कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.