पुण्याच्या प्रत्येक पोलिस ठाण्यात 'व्हिजीटर्स मॅनेजमेंट सिस्टिम' 

pune
pune
Updated on

पुणे : शहर पोलिस आयुक्तालयातील प्रत्येक पोलिस ठाण्यात शनिवारपासून ‘व्हिजीटर्स मॅनेजमेंट सिस्टिम’ सुरू करण्यात आली. या अंतर्गत पोलिस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची संगणीकृत नोंदीसोबतच संबंधितांचे छायाचित्र, येण्याचा उद्देश, येण्याची व जाण्याची वेळ आदींची नोंद करण्यात येत आहे. या यंत्रणेमुळे नागरिकांच्या तक्रारींचे तत्काळ निरसन होणार आहे. 

स्वारगेट पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कदम म्हणाले, ‘‘पोलिस ठाण्यात आलेल्या प्रत्येक तक्रारदारांचे काम कमीत कमी वेळात विनाविलंब पूर्ण होऊन, त्यातून त्यांचे समाधान होणे अपेक्षित आहे. पोलिस ठाण्यात विविध कामासाठी आलेल्या अभ्यागतांची, सर्व माहिती या यंत्रणेद्वारे संगणकामध्ये संकलित होणार आहे.’’

पोलिस आयुक्त के. व्यंकटेशम, सहआयुक्त शिवाजीराव बोडके, अतिरिक्त आयुक्त (पश्‍चिम विभाग) रविंद्र सेनगावकर, उपायुक्त बच्चन सिंग, सहायक पोलिस आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा सेवाकक्ष स्वारगेट पोलिस ठाण्यात सुरू करण्यात आले आहे. यासह ही सेवा संपूर्ण शहरात सुरू करण्यात आली आहे. एक पोलिस अधिकारी, चार पोलिस कर्मचारी हे अभ्यागतांच्या नोंदीवरून संबंधित अभ्यागतांना दूरध्वनी, मोबाईलवर संपर्क करून तक्रारीचा निपटारा झाला आहे का?, आपणास आणखी काही मदत हवी आहे का? असे प्रश्‍न विचारण्यात येणार असल्याचे कदम यांनी सांगितले. 

सेवा कक्ष कार्यन्वयासाठी पुणे शहर पोलिस आयुक्तालयाकडून सर्व पोलिस ठाण्यात ‘सर्व्हिस एक्सलंस व्हिक्टिम असिस्टंस्‌’ अर्थात सेवा सॉफ्टवेअर बसविलेले टॅब देण्यात आले आहे. सर्व कर्मचाऱ्यांना सेवा साॅफ्टवअेर हाताळणीचे प्रशिक्षण शुक्रवारी देण्यात आले. 

‘‘तक्रारीची तत्काळ नोंद करून दखल घेतली गेली. त्यामुळे वेळ वाचला व समाधानही मिळाले.पोलिस नवीन तंत्रज्ञानाचे वापर करीत असल्यामुळे प्रत्येक वेळी पाठपुरावा करावा लागणार नाही. ’’
- श्‍वेता पालेशा, सॅलेसबरी पार्क

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.