पुणे - कामगार, अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दिवशी पगारी सुटी द्यावी. अपवादात्मक परिस्थितीत पूर्ण दिवस सुटी देणे शक्य नसेल, तर किमान दोन ते तीन तासांची सवलत द्यावी, असा आदेश सरकारने काढला आहे.
पुणे जिल्ह्यात दोन टप्प्यांत निवडणुका होणार आहेत. पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघासाठी २३ एप्रिलला, तर शिरूर आणि मावळ मतदारसंघासाठी २९ एप्रिलला मतदान होणार आहे. निवडणुकीत सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजावणे अपेक्षित आहे. त्यासाठी आयोगाकडून विविध मोहिमा राबविल्या जातात. मात्र, काही संस्थांमध्ये कामगारांना सुटी मिळत नसल्याने अनेकांना मतदानाचा हक्क बजावता येत नाही, असे निदर्शनास आले आहे.
या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबत आदेश दिला आहे. हा आदेश खासगी कंपन्या, सर्व दुकाने, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, माहिती तंत्रज्ञान कंपन्या, मॉल यांनाही लागू करण्यात आला आहे. कंपनी अथवा आस्थापनांनी मतदानाकरिता सुटी अथवा सवलत न दिल्याने एखाद्या कामगाराला मतदान करता आले नाही, तर अशा मतदारांना राज्य सरकार आणि आयोगाकडे तक्रार करता येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.