सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीसाठी आज सकाळी दहा वाजल्यापासून मतदानाला सुरवात होणार आहे.
पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीसाठी आज सकाळी दहा वाजल्यापासून मतदानाला सुरवात होणार आहे. मतदान प्रक्रियेची सर्व तयारी विद्यापीठ प्रशासनाकडून केली असून मतपेट्या आणि निवडणूक प्रतिनिधी आपापल्या केंद्रावर शनिवारीच रवाना झाले.
विद्यापीठाच्या अधिसभेसाठी पदवीधरांमधून दहा उमेदवार अधिसभेवर निवडून देण्यासाठी ही निवडणूक होत आहे. पुणे, नगर आणि नाशिक व सिल्वासा येथे विद्यापीठातील दोनशेहून निवडणूक प्रतिनिधी, केंद्र निरीक्षक यांच्या देखरेखीखाली तसेच पोलिसांच्या बंदोबस्तात ही निवडणूक प्रक्रिया होणार आहे. यासाठीचे आवश्यक प्रशिक्षण, तसेच आवश्यक त्या सर्व प्रकारची खबरदारी विद्यापीठाकडून घेतली आहे. मतदान नोंदणी दरम्यान काही अनुचित प्रकार घडण्यास कडक कारवाई केली जाईल, असे विद्यापीठ निवडणूक विभागाने स्पष्ट केले आहे.
सर्व केंद्रांवर सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया होणार आहे. ‘सर्वांनी या निवडणुकीत सहभागी होत लोकशाही अधिक बळकट करावी,’ असा संदेश विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांनी दिला आहे.
‘ही निवडणूक निष्पक्ष व पारदर्शी होण्यासाठी सर्व तयारी विद्यापीठाने पूर्ण केली आहे. यावेळी विक्रमी मतदान होईल, अशी अपेक्षा आहे.’
- डॉ. प्रफुल्ल पवार, कुलसचिव आणि निवडणूक निर्णय अधिकारी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
दहा जागांसाठी ३७ उमेदवारांचे अर्ज
पदवीधर मतदार संघातून अधिसभेच्या दहा जागांसाठी एकूण ३७ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. यात पाच खुल्या जागांसाठी १८ उमेदवार, एका अनुसूचित जाती प्रवर्गासाठी पाच उमेदवार, एका अनुसूचित जमाती प्रवर्गातील जागेसाठी ४ उमेदवार, विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातील एका जागेसाठी ४ उमेदवार, इतर मागास प्रवर्गासाठी एका जागेसाठी चार उमेदवार तर महिला प्रवर्ग एका जागेसाठी दोन उमेदवारांनी अर्ज भरले आहेत.
मतदान येथे होणार
- पुणे शहर, पुणे ग्रामीण, नगर, नाशिक, सिल्वासा
मतदान केंद्रांची यादी पाहण्यासाठी संकेतस्थळ
- www.unipune.ac.in
नोंदणी झालेले पदवीधर
- ८८ हजार ८३१ पदवीधर
मतदान केंद्रांची संख्या -
एकूण : ७१
पुणे शहर :२६
पुणे ग्रामीण : १०
नाशिक : १९
नगर : १५
सिल्वासा : १
निवडणुकीसाठी त्रिस्तरीय यंत्रणा
- विभागीय निरीक्षक : ४
- केंद्र निरीक्षक : ७४
- बूथ प्रतिनिधी : ११४
- पोलिस कर्मचारी : १२०
- सुरक्षारक्षक : ५००
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.