wagholi wagheshwar temple maha shivratri festival devotee culture significance pune
wagholi wagheshwar temple maha shivratri festival devotee culture significance puneSakal

Maha Shivratri 2024 : वाघोलीत वाघेश्र्वर मंदिरात भाविकांचे हर हर महादेवचा जयघोष

महाशिवरात्री निमित्त वाघोलीतील वाघेश्र्वर मंदिरात हजारो भाविकांनी हर हर महादेवचा जयघोष केला. मंदिराला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. गुरुवारी रात्री पासूनच भाविकांची गर्दी होती.
Published on

वाघोली : महाशिवरात्री निमित्त वाघोलीतील वाघेश्र्वर मंदिरात हजारो भाविकांनी हर हर महादेवचा जयघोष केला. मंदिराला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. गुरुवारी रात्री पासूनच भाविकांची गर्दी होती.

  वाघेश्वर मंदिर हे पुरातन असून प्रसिद्ध मंदिर आहे. महाशिवरात्री निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. गुरुवारी रात्री 12 नंतर मंदिर विश्वस्त यांचा अभिषेक झाल्यानंतर पहाटे पर्यंत अभिषेक सुरू होते.

रात्री पासूनच भाविकांची दर्शनासाठी रांग सुरू झाली. यंदा दर्शन रांग साठी अधिक व्यवस्था करण्यात आल्याने रांग रोडवर आली नाही. गाभाऱ्यात प्रवेश न देता बाहेरूनच दर्शन असल्याने

भाविकांना सुलभ दर्शन घेता आले. मंदिरा बाहेर पारायण व भजन ही सुरू होते. आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. मंदिर परिसरातील तळ्यात बोटिंगचां आनंद भाविकांनी लुटला. मंदिराच्या बाहेर अनेक दुकाने थाटली होती.

तेथे ही खरेदी साठी भाविकांची गर्दी होती. पहाटे वाघेश्वर तरुण मंडळाच्या वतीने महाशिवरात्री पहाटचे ही आयोजन करण्यात आले होते. त्याचाही आनंद भाविकांनी लुटला.  मंदिर ट्रस्टला मदतीसाठी भाविक पुढे येत होते.

वाघोली विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र सातव, उपाध्यक्ष रामदास दाभाडे इतर विश्वस्त भाविकांची गैरसोय होवू नये यासाठी झटत होते. लोणीकंद पोलीस ठाण्याचे  वरिष्ठ पोलिस निरीक्षक कैलास करे यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तर

लोणीकंद वाहतूक विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक गजानन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतुकीचे नियोजन करण्यात आले होते.

प्रसादासाठीही मोठी रांग

जय गणेश ग्रुपच्या वतीने सुमारे सात ते आठ हजार लिटर लस्सी, कावेरी ग्रुप ऑफ हॉटेल्सच्या वतीने हजारो केळे तर विजय गायकवाड मित्र परिवाराच्या वतीने सुमारे 1200 किलो बटाटा चिवडा भाविकांना प्रसाद म्हणून वाटला जात होता. हा प्रसाद घेण्यासाठी ही मोठी रांग होती. मंदिर परिसरात असलेल्या स्मशानभूमीत बसून भाविकांनी प्रसादाचां आस्वाद घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.