वाघोली - वाघोलीतील एका तरुणीला १० लाख रुपयांचा तर दुसऱ्या तरुणाला सव्वा तीन लाख रुपयांचा गंडा सायबर चोरट्यांनी घातला. कुरियरमध्ये ड्रग्स सापडले असल्याची धमकी देवून तरुणीकडून १० लाख रुपये तर क्रेडिट कार्डद्वारे सव्वा तीन लाख रुपयांची तरुणाची फसवणूक करण्यात आली या दोन्ही प्रकरणी लोणी कंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.