Wakad News : जिल्हा नियोजन समितीने दुर्लक्षित भागाचा विकास करावा - हर्षवर्धन पाटील

मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा नियोजन समितीत ज्याचा दरारा अधिक आहे त्याला त्याच्या भागाकरीता अधिक निधी मिळतो.
Harshwardhan Patil
Harshwardhan Patilsakal
Updated on

वाकड - मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा नियोजन समितीत ज्याचा दरारा अधिक आहे त्याला त्याच्या भागाकरीता अधिक निधी मिळतो. मात्र, ज्या भागाला कोणी वाली नाही जे भाग कायम दुर्लक्षित आहेत अशा भागावरसुद्धा सदस्यांनी लक्ष देऊन विकास साधावा असे आवाहन पुणे जिल्हा नियोजन समितीच्या नवनियुक्त सदस्यांना माजी संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी वाकड येथे केले.

पुणे जिल्हा नियोजन समितीवर नव नियुक्ती झालेल्या सदस्यांच्या सन्मान सोहळयाचे प्रा. भारती विनोदे व विनोदे परिवाराच्या वतीने विनोदे नगर येथे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री संजय उर्फ बाळा भेगडे, आमदार आश्विनी जगताप, शरद ढमाले, शंकर जगताप, साध्वी वैष्णवी सरस्वती, ज्ञानेश नवले, हभप शेखर महाराज जांभूळकर, माजी नगरसेवक व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

प्रास्ताविकपर भाषणात प्रा. भारती विनोदे म्हणाल्या पक्षाने माझी जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी निवड करून, एकप्रकारे समाजासाठी एकनिष्ठतेने काम करणाऱ्या महिलेचा सन्मान केला आहे. त्यामुळे आज खऱ्या अर्थाने दिवंगत लक्ष्मण जगताप यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. बाळा भेगडे म्हणाले, स्थानिक स्वराज संस्थेमध्ये जिल्हा नियोजन समितीचे महत्त्व हे मंत्रिमंडळ समान आहे.

Harshwardhan Patil
Gas Leakage : बेकायदा गॅस विक्री बेतली जीवावर; गॅस गळती होऊन भाजलेल्या तिघांपैकी एकीचा मृत्यू

पालक मंत्री जिल्ह्याचा एकप्रकारे मुख्यमंत्रीच असतो त्यामुळे जिल्हा नियोजन समितीचे सदस्यपद हे महत्त्वाचे आहे. आमदार अश्विनी जगताप म्हणाल्या, भारती विनोदे यांचे कार्य आदर्श असून यापुढील काळात देखील त्यात सातत्य राहील.

शरद बुट्टे पाटील, काळुराम नढे, तानाजी शिंगाडे जीवन कोंडे, प्रा. भारती विनोदे या नवनियुक्त सदस्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते झाला. यावेळी विनोदे यांच्या राजकीय-सामाजिक जीवन कार्यावरील व्हिडीओ डॉक्युमेंटरी प्रदर्शित करण्यात आली. भंडारा डोंगरावरील मंदिरासाठी विनोदे परिवाराच्या वतीने संयोजक राजेंद्र विनोदे यांनी एक लाख आकार हजारांची देणगी सुपूर्त केली. तुळशीराम घोलप यांनी सूत्रसंचालन केले. संत तुकाराम साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब विनोदे यांनी आभार मानले. स्नेह भोजनाने सोहळ्याची सांगता झाली.

Harshwardhan Patil
NIRF : एनआयआरएफमध्ये पहिल्या शंभरात ११ संस्था महाराष्ट्रातील

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचे आभार

नियोजन समितीची आठशे कोटींची तरतूद वाढवून यंदा १३५० कोटी रुपयांची केल्याने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे हर्षवर्धन पाटील यांनी आभार मानले. जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांच्या सन्मान सोहळ्याचे आजवरच्या काळात प्रथमच आयोजन करत भारती विनोदे यांनी एक आगळा पायंडा पडल्याचे सांगत भारती विनोदे व विनोदे परिवाराचेही त्यांनी कौतूक केले.

तर पुणे जिल्हा नियोजन समितीने भंडारा डोंगर विकास आराखड्याकरीता पाच कोटींचा निधी दिल्याने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री व माजी मंत्री बाळा भेगडे यांचे हभप. पंकज महाराज गावडे यांनीही आभार मानले. यापुढील काळातही सहकार्य करण्याचे आवाहन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.