वाकडमध्ये १५ मीटर उंचीवर असणार मेट्रो

Metro
Metro
Updated on

पिंपरी - शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्ग शहराच्या वाकड भागात सुमारे १५ मीटर उंचीवर असेल. त्याच्या कामास पीएमआरडीएने महापालिकेकडे परवानगी मागितली आहे. 

महामेट्रोकडून स्वारगेट ते पिंपरी आणि वनाज ते रामवाडी या मार्गांवर मेट्रो मार्गाचे काम सुरू आहे. तिसरा शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो मार्ग ‘संकल्पना करा, बांधा, आर्थिक पुरवठा करा, वापरा व हस्तांतरित करा’ (डीबीएफओटी) तत्त्वावर सार्वजनिक खासही सहभागाने (पीपीपी) उभारण्यात येणार आहे.

त्याची आखणी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) केली आहे. ‘उन्नत’ मार्ग म्हणून तो ओळखला जाणार आहे. या मार्गावर मेट्रो स्थानक सुविधा व कार डेपोसाठी आवश्‍यक खासगी जमीन संपादन करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिलेली आहे. मुंबई-बंगळूर (देहूरोड-कात्रज बाह्यवळण रस्ता) महामार्गाने मुळा नदीवरील पुलापासून वाकड येथील भुजबळ वस्तीपर्यंत पिंपरी-चिंचवड शहरातून हा मेट्रो मार्ग जाणार आहे. हे अंतर साधारणतः दोन किलोमीटर आहे. वाकड ते हिंजवडी जोडणाऱ्या उड्डाण पुलावरून मेट्रो मार्ग जाणार असल्याने त्याची उंची सुमारे १५ मीटर असेल. त्यासंदर्भाचा प्रस्ताव पीएमआरडीएने महापालिकेकडे पाठविला आहे. त्यास मंजुरी देण्याचा विषय गुरुवारी (ता. २०) होणाऱ्या महापालिका सर्वसाधारण सभेसमोर ठेवला आहे.

पीएमआरडीएच्या मागण्या
 प्रस्तावित स्थानके व मुख्य रस्त्यांना जिने जोडण्यासाठी परवानगी द्या
 मेट्रो मार्गिकेसाठी १०.२३ मीटर रुंद जागा उपलब्ध करून देणे
 मेट्रो मार्ग टाकण्यासाठी ‘ना- हरकत’ प्रमाणपत्र तातडीने द्यावे
 पालिका हद्दीतील जागा विनामोबदला, विनाअडथळा उपलब्ध करा
 स्टेशन व जिन्यासाठी आवश्‍यक जागा रीतसर मालकी हक्काने हस्तांतरित करावी
 खासगी जमिनींचे हस्तांतरण एफएसआय किंवा टीडीआर स्वरूपात करून द्यावे
 रस्त्यांच्या मध्यावर किंवा प्रस्तावित जागेत मेट्रो खांब उभारण्यास संमती द्यावी
 महापालिका विकास आराखड्यातील प्रस्तावित रस्ता रुंदीकरण जागा उपलब्ध करून द्यावी

पीएमआरडीए करणार
 वाकडमधील भुजबळ चौकातील, बाह्यवळण मार्गावरील उड्डाण पूल व नजीकच्या वाहनतळाचे आरक्षण यांचे एकत्रित नियोजन करून वाहतूक सुधारणाविषयक कामे
 मेट्रोमुळे बाधित अत्यावश्‍यक सेवा वाहिन्या पाणीपुरवठा, सांडपाणी, विद्युत, दूरसंचार आदींच्या स्थलांतरणाची कामे स्वखर्चाने करणार
 मेट्रो प्रकल्पासाठीच्या अत्यावश्‍यक सर्व परवानग्या स्वखर्चाने घेणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.