Wakad Yatra : कम्प्युटर्सच्या गर्दीत रंगला बगाडाचा थरार; चांगभलं म्हणत गुलालात रंगलं आयटी पार्क

हा अनोखा क्षण आपल्या मोबाईलमध्ये टिपण्यासाठी हजारो हात सरसावले होते.
Wakad Bagaad Yatra
Wakad Bagaad YatraSakal
Updated on

हिंजवडी, ता. ६ : आयटीनगरी हिंजवडी व वाकडचे ग्रामदैवत म्हातोबा देवाची बगाड यात्रा गुरुवारी सायंकाळी मोठ्या उत्साहात संपन्न झाली. दरवर्षीच्या तुलनेत भक्तांची अलोट गर्दी अन बगाड रथावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी हे यंदाच्या बगाड मिरवणुकीचे वैशिष्ट्ये ठरले. यंदा गळकरी होण्याचा मान किशोर ज्ञानोबा जांभुळकर यांना मिळाला.

चैत्र पौर्णिमा हनुमान जयंतीला म्हातोबा देवाची यात्रा असते. गुरुवारी वाकडहून ग्रामस्थ गळ घेऊन होळीच्या पायथ्याला आल्यानंतर किसन साखरे पाटील यांनी गळाचा मानकरी पुकारला. यंदा खांदेकऱ्यांचा मान ऋषीकेश राजेंद्र साखरे व दिनेश सुरेश साखरे यांना मिळाला.

Wakad Bagaad Yatra
Pune Crime News: पुणे तिथे काय उणे! मुलीचा लग्नाला नकार पठ्याची थेट आमदारालाच धमकी

खांदेकऱ्यांनी म्हातोबा मंदिरात गळकऱ्याला आणताच स्नान घालण्यात आले. सुहासिनींनी नवरदेवाप्रमाणे हळदी-कुंकवाचा मळवट भरला. पारंपरिक देवाचा, फेटा उपरणे, पंचा असे वस्त्र नेसवून मारुतीचे दर्शन करून गळकऱ्याला होळीच्या पायथ्याशी आणले. तिथे साखरे पाटील आणि सुतार कुटुंबातील गराडे यांनी मानाप्रमाणे गळकऱ्याला गळ टोचला. त्यानंतर गळकऱ्याला बगाडावर बसविण्यात आले. यावेळी मुख्य शेले पिचकले.

त्यामुळे गळकऱ्याचे पाच रिंगण न होता, मिरवणूक मार्गस्थ झाली. यावेळी ‘चांग भलंच्या गजराने जणू आसमंत दुमदुमले. हुलावळे परिवाराला काठीचा मान असतो. भंडारा-खोबऱ्याची उधळण करत ‘चांगभलं’, ‘पैस...पैस’च्या गजरात भूमकर वस्ती, वाकडकर वस्ती, देवकर वस्ती, भुजबळ वस्ती, वाकड गावठाण या मार्गे गाठभेट घेत बगाड मिरवणूक वाकड गावठाणातील म्हातोबा मंदिरात पोहचताच सांगता झाली.

Wakad Bagaad Yatra
Pune Lok Sabha Bypoll Election : पुण्यात लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मोठ्या घडामोडी; भाजपची ३ नावं समोर

रथावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

यंदाच्या बगाड रथावर व मिरवणुकीवर संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब उर्फ तुकाराम विनोदे परिवाराच्या वतीने पुष्पवृष्टी करण्यात आली. हा अनोखा क्षण आपल्या मोबाईलमध्ये टिपण्यासाठी हजारो हात सरसावले होते. विनोदे कुटुंबीयांनी होळी पायथ्यावरील बगाड रथावर आणि बगाड मिरवणूक मार्गावर पुष्पवृष्टी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.