वॉकेथॉनला भरभरून प्रतिसाद (व्हिडिओ)

प्राधिकरण - जागतिक मधुमेह दिनानिमित्त रोटरी क्‍लब ऑफ निगडी, रोटरी क्‍लब ऑफ प्राधिकरण, इंडियन मेडिकल असोसिएशन पिंपरी-चिंचवड, भोसरी शाखा यांच्या वतीने ‘वॉकेथॉन २०१८’मध्ये सहभागी नागरिक.
प्राधिकरण - जागतिक मधुमेह दिनानिमित्त रोटरी क्‍लब ऑफ निगडी, रोटरी क्‍लब ऑफ प्राधिकरण, इंडियन मेडिकल असोसिएशन पिंपरी-चिंचवड, भोसरी शाखा यांच्या वतीने ‘वॉकेथॉन २०१८’मध्ये सहभागी नागरिक.
Updated on

पिंपरी - सकाळच्या गारठ्यात रविवारी एरवी अनेकजण निवांत घरी आराम करीत असतात. मात्र, हा रविवार (ता. १८) याला अपवाद ठरला. जागतिक मधुमेह दिनानिमित्त ‘वॉकेथॉन २०१८’ या उपक्रमात सहभागी होण्यासाठी अनेक नागरिक प्राधिकरणातील वीर सावरकर सदन येथे एकत्र जमा झाले.

रोटरी क्‍लब ऑफ निगडी, रोटरी क्‍लब ऑफ प्राधिकरण, इंडियन मेडिकल असोसिएशन पिंपरी-चिंचवड, भोसरी शाखा आदींच्या वतीने ‘वॉकेथॉन २०१८’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे एक हजाराहून अधिक नागरिकांनी यात सहभाग घेतला. सकाळी सातच्या सुमारास ‘सकाळ’चे सहयोगी संपादक अविनाश चिलेकर यांच्या हस्ते फुगे हवेत सोडून ‘वॉकेथॉन २०१८’चे उद्‌घाटन झाले. त्यानंतर काचघर, भेळ चौक, रोटरी जलकेंद्रमार्गे पुन्हा भेळ चौक या मार्गाने पुन्हा वीर सावरकर सदन येथे परतली. अगदी विद्यार्थ्यांपासून ८० वर्षांहून अधिक वयाच्या ज्येष्ठांनी यामध्ये सहभाग घेतला. ‘रक्तशर्करा ठेवा नियंत्रणात, निरोगी राहील हृदय आपोआप’, ‘चाला ३० मिनिटे रोज भरभर निरोगी राहा आयुष्यभर’, असे फलक मुलांनी हातात घेतले होते. 

यानिमित्त वीर सावरकर सदन येथे मधुमेहाबद्दलचे प्रदर्शनही भरविण्यात आले होते. या वेळी रक्तशर्करेची मोफत तपासणी करण्यात आली. तनपुरे फाउंडेशनचे कार्यकर्तेही या उपक्रमात सहभागी झाले होते. डॉ. मानसी व विनायक हराळे यांनी मधुमेहाविषयी मार्गदर्शन केले. 

या वेळी वॉकेथॉनमध्ये सहभागी नागरिकांच्या डोळ्यांची तपासणी करण्यात आली. या वेळी रोटरी क्‍लब ऑफ निगडीचे अध्यक्ष डॉ. सुभाष जयसिंघानी, पिंपरी रोटरी क्‍लबच्या अध्यक्षा वैजयंती आचार्या, डॉ. रवींद्र कदम या वेळी उपस्थित होते. 

याबाबत इंडियन मेडिकल असोसिएशनचे पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष डॉ. संजय देवधर म्हणाले, ‘‘वॉकेथॉनचे यंदाचे दुसरे वर्ष आहे. मधुमेहाबद्दल नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन केले जाते. मधुमेहाबद्दल जागरूकता निर्माण झाल्यास त्यापासून निर्माण होणाऱ्या अन्य आजारांनाही नियंत्रणात आणता येते.’’

गेली दहा वर्षे मी नियमितपणे चालत आहे. त्यामुळे माझा मधुमेह नियंत्रणात आहे. मधुमेहाविषयी जनजागृती करण्यासाठी वॉकेथॉनचा उपक्रम स्तुत्य आहे. 
- रामचंद्र कुंभार, प्राधिकरण 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.