पुणे - महापालिकेच्या वतीने पादचारी दिनानिमित्त ११ डिसेंबरला लक्ष्मी रस्त्यावरील सेवासदन चौक ते उंबऱ्या गणपती चौक आणि गरूड गणपती चौकदरम्यान पादचाऱ्यांसाठी ‘वॉकिंग प्लाझा’चे नियोजन करण्यात आले आहे.
‘वॉकिंग प्लाझा’च्या दिवशी लक्ष्मी रस्त्यावर सोमवारी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे. सेवासदन चौकापासून उंबऱ्या गणपती चौक आणि गरूड गणपती चौकापर्यंत सर्व वाहनांच्या वाहतुकीस बंदी राहील. सेवासदन चौक ते उंबऱ्या गणपती चौकदरम्यान वाहतुकीच्या परिस्थितीनुसार आवश्यकतेनुसार बदल करण्यात येतील, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिली.
असा आहे पर्यायी मार्ग -
लक्ष्मी रस्त्याने बेलबाग चौकातून टिळक चौकाकडे जाणारी वाहतूक सेवासदन चौकातून उजवीकडे वळून बाजीराव रस्त्याने जातील. कुमठेकर रस्त्यावरून लक्ष्मी रस्त्याकडे जाणारी वाहने चितळे कॉर्नर डावीकडे वळून बाजीराव रस्त्याने जातील.
रमणबाग चौकातून उंबऱ्या गणपती चौकाकडे जाणारी वाहने लक्ष्मी रस्त्याकडे न जाता सरळ केळकर रस्त्याने टिळक चौकमार्गे जातील. निंबाळकर तालीम चौकाकडून कुंठे चौकाकडे जाणारी वाहने लक्ष्मी रस्त्याने न जाता केळकर रस्त्याने टिळक चौकमार्गे इच्छितस्थळी जातील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.