वीज कडाडल्यानंतर कोसळलेल्या भिंतीच्या ढिगाऱ्यात गाडले वृद्ध पती- पत्नी 

dead
dead
Updated on

आळेफाटा (पुणे) : जुन्नर तालुक्यातील बोरी बुद्रुक येथे सोमवारी (ता. ७) रात्री घराची भिंत कोसळून त्याखाली गाडले गेल्याने एक ज्येष्ठ नागरिक जागेवरच ठार झाला, तर त्यांची पत्नी किरकोळ जखमी झाली आहे.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
      
याबाबत आळेफाटा पोलिस ठाण्याच्या सूत्रांकडून समजलेल्या माहितीनुसार, बोरी बुद्रुक येथील बाजारतळाजवळील पत्र्याचे छप्पर असलेल्या घरात दादाभाऊ किसन बोरगे (वय 74) व त्यांची पत्नी लिलाबाई हे वृद्ध दांपत्य राहत आहे. सोमवारी (ता. ७) रात्री विजेच्या कडकडाटासह जोरात पाऊस सुरु होता. त्यावेळी वीज चमकल्याने मोठा आवाज झाला. त्यावेळी दादाभाऊ बोरगे यांच्या घराची भिंत कोसळून हे दोघेही वृद्ध पती- पत्नी त्याखाली गाडले गेले. यावेळी त्यांचा पुतण्या आतिश बोरगे व स्थानिक ग्रामस्थांनी दोघांना ढिगाऱ्याबाहेर काढले. मात्र, या दुर्घटनेत दादाभाऊ यांना गंभीर मार लागला. त्यात ते ते जागेवरच ठार झाले, तर त्यांची पत्नी लिलाबाई या किरकोळ जखमी झाल्या. 

दरम्यान, याबाबतची फिर्याद आतिश गजानन बोरगे यांनी आळेफाटा पोलीस ठाण्यात दिली आहे. याबाबतचा पुढील तपास आळेफाटा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस शिपाई नारायण बर्डे हे करीत आहेत.
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()