आम्हाला येथून निघायचंय घरी यायचंय!!

युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या भावना
युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या भावना
युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या भावनाsakal
Updated on

पुणे: आम्हाला, मायदेशी परत घेऊन जाण्यासाठी भारतीय विमाने आल्याचे सांगितले जात आहे. परंतु सध्या असलेल्या ठिकाणाहून विमानापर्यंत पोचण्यासाठी तब्बल ३०० ते ८०० किलोमीटरचा प्रवास करावा लागणार आहे. ‘काहीही करून भारतीय विमानापर्यंत या’, असे भारतीय दूतावासातील अधिकारी सांगत आहेत. पण, त्यासाठी ना बस मिळतीयं, ना कार! जागोजागी कर्फ्यू लागू असल्याने बंकरमधून बाहेर पडणेही शक्य होत नाहीये. आम्हाला येथून निघायचंय, घरी यायचंय,’’ अशा अगदी भेदरलेल्या दबक्या आवाजात युक्रेनमध्ये अडकलेल्या पुण्यातील विद्यार्थ्यांनी भावना व्यक्त केल्या. खरंतर, हे विद्यार्थी घाबरलेत असले, तरीही एकमेकांना धीर देत आहेत.

युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या भावना
Pune Corporation Election: निवडणुकीची सूत्रे राजेश पांडे यांच्याकडे

युक्रेन देशातील सहाव्या क्रमांकाचे मोठे शहर असणाऱ्या झापोरिझिया येथील वैद्यकीय विद्यापीठात अनेक परदेशी विद्यार्थी अडकले आहेत. हे विद्यार्थी सुरक्षित रहावेत, म्हणून विद्यापीठाने या विद्यार्थ्यांना वसतिगृहाच्या तळात असणाऱ्या बंकरमध्ये सुरक्षितपणे हलविले आहे. यामध्ये भारतासह नायजेरिया अशा विविध देशातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यात भारतातील ५०० ते ६०० विद्यार्थ्यांसह महाराष्ट्रातील १५-२० विद्यार्थी अडकले आहेत. मुळची आंबेगाव तालुक्यातील गावडेवाडी येथील वेदांती मुळे सध्या याच विद्यापीठात एमबीबीएसच्या पहिल्या वर्षात शिकत आहे. वेदांती म्हणाली,‘‘युक्रेनमध्ये हल्ला झाल्याचे माहिती मिळताच विद्यापीठ प्रशासनाने आम्हा सर्व विद्यार्थ्यांना बंकरमध्ये हलविले. युद्धाचा अंदाज आल्याने एक-दोन आठवड्याचे किराणा माल सोबत ठेवले आहे. परंतु बंकरमध्ये जेवण बनविण्याची सोय नसल्याने केवळ स्नॅक्स आणि पाणी यावर आम्ही आहोत. भारतीय दूतावासाकडून आम्हाला मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. रोमानिया आणि पोलंडमध्ये भारतीय विमाने आल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु झापोरिझिया येथे कर्फ्यू लागू असल्याने आम्हाला विमानापर्यंत पोचविण्यासाठी कोणतीही स्थानिक बस चालक तयार होत नाहियेत.’’

युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या भावना
Pune Corporation Election: हरकतींचा पाऊस पण सुनावणीला निरुत्साह

कौनेन बेग ही सध्या युक्रेनमधील व्ही एन कराझिन खारकीव नॅशनल विद्यापीठात एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षात शिकत आहे. ती म्हणाली,‘‘माझे संपूर्ण शिक्षण हे पुण्यात झाले आहे. सध्या येथील परिस्थिती खूपच गंभीर आहे. मायदेशी परतायचे असून त्या प्रतीक्षेत आम्ही आहोत. आम्हाला मदतीची गरज आहे. सुरक्षित असलो, तरी युद्ध परिस्थितीमुळे खूप घाबरले आहे.’’

रशियाच्या सैन्याने युक्रेनची राजधानी असलेल्या किव्हजवळ रणगाडे आणले आहेत. परिणामी येथील परिस्थिती अधिकच चिंताजनक बनली असून येथे अडकलेले भारतीय विद्यार्थी हतबल झाले आहेत. किव्हमधील वैद्यकीय विद्यापीठामध्ये शिक्षण घेणारे जवळपास ३००-४०० भारतीय विद्यार्थी हे सध्या तेथील भारतीय दूतावासाच्या कार्यालयाजवळ असणाऱ्या एका शाळेत आहेत. पुण्यातील आकाश हिंगे हा विद्यार्थी देखील त्यात अडकला आहे. ‘‘किव्हमधील परिस्थिती अधिक चिघळण्याची शक्यता असल्याने भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांनी आम्हाला निघण्यास सांगत आहेत. पोलंड आणि हंगेरी येथे भारतीय विमाने असल्याचेही सांगण्यात येत आहे.’’ असा अनुभव आकाश याने सांगितला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.