शिवणे - वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत प्रभाग क्र. १३, ३१, ३२, ४२ व नव्याने समाविष्ट न्यू कोपरे व कोंढवे-धावडे या सर्व ठिकाणी एकूण ३० ठिकाणी गणेश विसर्जनाची व्यवस्था केली होती. या ठिकाणी १० दिवसात ४२ हजार ४९४ मूर्तींचे विसर्जन झाले. त्यापैकी विसर्जनाच्या शेवटच्या दिवशी २३ हजार ०९१ गणपतींचे विसर्जन झाले आहे.
त्यासाठी, एकूण ३० ठिकाणी ८ बांधीव हौद, ७३ टाक्या व ९ ठिकाणी मूर्ती संकलन व्यवस्था करण्यात आली. एकूण ८ बांधीव हौदामध्ये चार हजार २३१ मूर्ती, ७३ लोखंडी टाक्यांमध्ये १० दिवसात एकूण ३७ हजार ७५० मूर्तींचे विसर्जन झाले. त्यापैकी, शेवटच्या दिवशी २० हजार ८४८ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्याचप्रमाणे मूर्तीं संकलन केंद्रांवर एकूण ५१३ मूर्तींचे संकलित करण्यात आल्या.