Pune News : वारज्यात ३७५ खाटांच्या रुग्णालयाचे उद्या भूमिपूजन; दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

महापालिकेच्या वारज्यातील १० हजार ९१० चौरस मीटर जागेवर ३७५ खाटांच्या रुग्णालयाचे उद्या रविवारी (दि. १०) रोजी उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हे भूमिपूजन होत आहे.
Hospital Bhoomipujan
Hospital BhoomipujanSakal
Updated on

खडकवासला - महापालिकेच्या वारज्यातील सर्व्हे नंबर ७९ मधील १० हजार ९१० चौरस मीटर जागेवर ३७५ खाटांच्या रुग्णालयाचे उद्या रविवारी (दि. १०) रोजी उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हे भूमिपूजन होत आहे.

या जागेवर सध्या कै. अरविंद गणपत बारटक्के रुग्णालय व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले डायलिसिस सेंटर सुरु आहे. ही २०१२ मध्ये बांधलेली दुमजली इमारत पडून या ठिकाणी नवीन अत्याधुनिक रुगणालय उभारले जाणार आहे.

नवीन अत्याधुनिक रुग्णालय संदर्भात

-मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल करिता जागा आरक्षित आहे.

-जागेचे क्षेत्रफळ अंदाजे १० हजार ९१० चौरस मीटर एवढे आहे.

-मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे.

-डिजाईन- बील्ट- फायनान्स, ऑपरेट- ट्रान्सफर (DBFOT) रचना करा, बांधा, वित्त, चालवणे, हस्तांतरण तत्वावर

-मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू केल्यास याठिकाणी शहरातील गरीब व गरजू रूग्णांना अल्प दरामध्ये मल्टीस्पेशालिटी आरोग्य विषयक सेवा सुविधा उपलब्ध होणार आहे.

-मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभे करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली

-३७५ बेड्सचे हॉस्पीटल कार्यान्वित होणार आहे.

-१०टक्के बेड्स पुर्णपणे मोफत,

-६ टक्के बेड्स केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेच्या(सीजीएचएस)दरासाठी

-इतर बेड्स या खाजगी दरामध्ये पात्र निविदा धारकाकडून डिजाईन -बील्ट- फायनान्स- ऑपरेट- ट्रान्सफर (DBFOT ) तत्वावर घेण्यात येणार आहेत.

-मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल साठी आवश्यक ती यंत्रसामुग्री व कुशल व अकुशल मनुष्यबळ पुरविण्याची जबाबदारी निविदा धारकावर राहणार आहे.

-पात्र निविदा धारकास ३० वर्षे कराराने चालविण्यास देण्यात येणार आहे.

-मुदती अंती मिळकत महानगरपालिकेकडे हस्तांतरीत करून घेण्यात येणार आहे.

-निविदा हि प्लॅन,डिझाईन, बिल्ट, इक्विप, फायनान्स तत्वावर असून सदर प्रकल्पा अंतर्गत सुमारे चार लाख स्क्वेअर फूट पेक्षा अधिक बांधकाम होऊ शकते.

-हॉस्पिटलचे सर्व इंटेरियर, फर्निचर, मल्टीस्पेशालिटी रुग्णालय करीता आवश्यक सर्व वैदयकिय शस्त्र उपकरणे व यंत्र सामुग्री यांचा अंतर्भाव करण्यात आला.

-प्रकल्पाकरीता अंदाजीत खर्च रक्कम रु. ३५० कोटी इतका अपेक्षित आहे.

-तीन वर्षामध्ये कार्यान्वित करणार

-प्रकल्पाकरीता आवश्यक असणाऱ्या राज्य शासनाच्या परवानग्या व ना हरकत दाखले प्राप्त झाली आहेत.

-मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अद्ययावत रेडिओलॉजी, कार्डिओलॉजी, नेफ्रोलॉजी, युरॉलॉजी, सर्जरी, पीडियाट्रिक, ऑर्थोपेडिक्स, गायनॅकॉलॉजी, एन. आय.सी.यु. व आय.सी.यू. अदययावत शस्त्रक्रिया गृहे, मॉडिलर ऑपरेशन थिएटर, सर्व प्रकारच्या प्रयोगशाळा तपासण्या व निदान व अत्याधुनिक उपचार सुविधा उपलब्ध होणार आहे.

-निविदेतील अटी शर्ती नुसार व राज्य शासनाकडून प्राप्त झालेल्या परवानगीनुसार प्रकल्प उभारणीकरीता कर्ज जरी पुणे महानगरपालिकेच्या खात्यावर घेण्यात येणार असले. तरी त्याची परतफेड पात्र निविदा धारकामार्फत करण्यात येणार आहे.

-प्रकल्प राबवताना व राबविल्यानंतर देखील पात्र निविदा धारक मार्फत पूर्ण कालावधीकरीता व पूर्ण कर्जाकरीता विमा उतरविण्यात आला आहे.

-यासाठी महानगरपालिका, पात्र निविदाधारक व वित्तपुरवठा करणारी बँक यांच्यामध्ये त्रिपक्षीय करारनामा करणार.

-याचे शुल्क पात्र निविदा धारकानी भरावयाची आहे.

- महानगरपालिकेस कोणतीही आर्थिक झळ बसणार नाही.

-प्रकल्प कार्यान्वित झालेनंतर महानगरपालिकेस रक्कम रूपये प्रतिवर्ष ९० लाख इतके वार्षिक उत्त्पन्न ३० वर्षाकरीता मिळणार आहे.या रकमेमध्ये दर वर्षी तीन टक्के वाढ करण्यात येणार आहे.

रुग्णालयाची ठळक वैशिष्ट्ये -

भारतात प्रथमच जर्मनी आणि नेदरलँड युरोपियन देशांनी जगामध्ये महापालिके सोबत केलेला पहिला प्रोजेक्ट.

-रूरल एन्हान्सर्स कंपनीमार्फत ४३ दशलक्ष युरो चा वित्तीय पुरवठा

-भारतात प्रथमच संपूर्ण प्रोजेक्टचा नेदरलँड शासनातर्फे संपूर्ण ९९ टक्के राजकिय व व्यावसायिक (पॉलिटीकल व कमर्शिअल ) रिस्क कव्हरेज विमा,

-आंतरराष्ट्रीय हॉस्पिटल संस्थेतर्फे संपूर्ण हॉस्पिटल व्यवस्थापन

-गरजूंसाठी आवश्यक असणाऱ्या रुग्ण सुविधा मोफत.

-अत्याधुनिक असे ६०,००० स्क्वेअर फुटाचे हीलिंग गार्डन व आंतरराष्ट्रीय दर्जाचा मानसिक आरोग्य विभाग असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.