पुणे - वारजे येथे खड्ड्यात पाणी जमा झालेले असताना त्यात सिमेंट काँक्रिट टाकून खड्डा बुजविण्याचा उद्योग ठेकेदाराला करणे चांगलेच महागात पडले आहे. समान पाणी पुरवठ्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराला महापालिकेने १ लाख रुपयांचा दंड ठोठावला असून, चुकीच्या पद्धतीने केलेला रस्ता उखडून टाकून तेथे नव्याने रस्ता करण्याचे आदेश दिले आहेत.
शहरात समान पाणी पुरवठा योजनेचे काम सुरु आहे, जलवाहिनी टाकल्यानंतर ठेकेदाराकडून सिमेंट काँक्रिट टाकून खड्डे बुजविले जात आहेत. वारजे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात जलवाहिनी टाकल्यानंतर त्या खड्ड्यात पावसाचे पाणी जमा झाले. हे पाणी बाहेर न काढता, खड्ड्यातील पाण्यात मिक्सरमधून थेट सिमेंट काँक्रिट टाकले जात होते.
त्यामुळे सिमेंटमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त झाल्याने हे काम निकृष्ट दर्जाचे झाले होते. हा प्रकार ‘सकाळ’ने उघडकीस आणल्यानंतर त्यावर नागरिकांनी समाज माध्यमावर पुणे महापालिकेवर आणि ठेकेदारावर टीकेची झोड उठवली. आमच्या कर रुपी पैशाचे वाटोळे केले जात आहे, महापालिकेत असाच भ्रष्टाचार होत आहे अशी टीका केली.
दरम्यान या वृत्ताची दखल घेत महापालिकेने निकृष्ट पद्धतीने केलेला रस्ता ठेकेदाराला उखडून टाकण्यास सांगून तेथे नियमानुसार काँक्रिटीकरण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आज हा रस्ता उखडला असून, गुरुवारी तेथे काँक्रिटीकरण केले जाणार आहे. तसेच ठेकेदाराच्या या चुकीच्या कामामुळे महापालिकेची बदनामी झाल्याने एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
‘समान पाणी पुरवठ्याचे काम एल अँड टी कंपनीकडून सुरु आहे. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर या कंपनीला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला गेला आहे. सल्लागारासही नोटीस बजावण्यात येणार आहे. या रस्त्याचे काम पुन्हा करण्याचे आदेश कंपनीला दिले आहेत दिले आहेत.’
- नंदकिशोर जगताप, प्रमुख, पाणी पुरवठा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.