Pune News: मित्र बुडाला पण घरी सांगितलंच नाही.. वारज्यातील वन उद्यानच्या खाणीत शाळकरी मुलाचा मृत्यू

वारजेतील रामनगर परिसरात राहणारा दक्ष सुशांत कांबळे असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या शाळकरी मुलाचे नाव आहे. वारजेतील रामनगर टेकडी परीसरालगत नागरी वन उद्यान असून या उद्यानातील खाणीत पावसाचे पाणी साचलेल्या साचते. याच खड्ड्यामध्ये गुरुवार दि. 15 ऑगस्ट रोजी दुपारच्या वेळी साधारण तेरा ते चौदा वर्षाची चार मुले पोहायला गेली होती.
pune news
pune newsesakal
Updated on

वारजे: केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाकडून साकारण्यात आलेल्या रामनगर गणपती माथा टेकडीवरील नागरी वन उद्यानातील खाणीतील पाण्यामध्ये पोहायला गेलेल्या लहान मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

वारजेतील रामनगर परीसरात राहणारा दक्ष सुशांत कांबळे (वय वर्षे 13, रा. रामनगर वैदुवाडी परीसर वारजे पुणे) असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या शाळकरी मुलाचे नाव आहे. वारजेतील रामनगर टेकडी परीसरालगत नागरी वन उद्यान असून या उद्यानातील खाणीत पावसाचे पाणी साचलेल्या साचते. याच खड्ड्यामध्ये गुरुवार दि. 15 आॅगस्ट रोजी दुपारच्या वेळी साधारण तेरा ते चौदा वर्षाची चार मुले पोहायला गेली होती.

त्यातील मयत दक्ष कांबळे हा पोहताना पाण्यात बुडाला. त्या सोबतची तिन मुले घाबरून गेल्याने त्यांनी दक्ष पाण्यात बुडाल्याची माहीती घरी दिली नाही. मात्र सायंकाळपर्यंत दक्ष घरी न आल्याने घरच्यांनी शोधाशोध करून त्याच्या मित्रांकडे चौकशी केली असता तो खाणीत पोहायला गेल्यावर पाण्यात बुडाल्याची माहीती दिली.

pune news
Ramgiri Maharaj: धर्मावरून वादग्रस्त वक्तव्य; राज्यात पडसाद, वादाच्या भोवऱ्यात अडकलेले रामगिरी महाराज कोण?

या घटनेची माहीती वारजे माळवाडी पोलीसांना मिळताच वारजे पोलीस आणि वारजे अग्निशमन दलाचे जवान रात्रीच्या वेळी घटनास्थळी दाखल होत शोध कार्य सुरू केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी जवळपास दोन तास बोटीच्या माध्यमातून शोधकार्य केले.

त्यानंतरही मृतदेह सापडला नव्हता. त्यानंतर पोलीसांनी आणलेल्या एका व्यक्तीने रात्री सव्वा बाराच्या सुमारास खाणीतील पाण्यात उतरून मुलाचा मृतदेह शोधला. शवविच्छेदनासाठी मृतदेह ससून रुग्णालयात पाठविण्यात आला. दक्ष हा शिवणे येथील नवभारत हायस्कूल या शाळेमध्ये इयत्ता सातवीमध्ये शिकत होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.