Pune News : महापालिकेकडे साडेसातशे बांधकाम व्यावसायिकांची नोंदणी

पुणे महापालिकेने पाणी बचतीसाठी शहरातील बांधकामासाठी मैलापाणी शुद्धीकरण केंद्रातील (एसटीपी) प्रक्रिया केलेले पाणी वापरणे बंधनकारक केले होते.
Pune Municipal Corporation
Pune Municipal Corporationsakal
Updated on

पुणे - महापालिकेने पाणी बचतीसाठी शहरातील बांधकामासाठी मैलापाणी शुद्धीकरण केंद्रातील (एसटीपी) प्रक्रिया केलेले पाणी वापरणे बंधनकारक केले होते. सुरवातीला त्याकडे बांधकाम व्यावसायिकांनी दुर्लक्ष केले होते, पण बांधकाम थांबविण्याचा इशारा दिल्यानंतर महापालिकेच्या ॲपवर ७६५ बांधकाम व्यावसायिकांनी नोंदणी केली असून, आत्तापर्यंत ४ लाख ९० हजार लिटर पाण्याच वापर बांधकामासाठी केले आहे.

महापालिकेने धरणातील पिण्याच्या पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी पालिकेकडून उपाय योजना केल्या जात आहेत. त्यामध्ये गळती कमी करण्यावर भर दिला जात आहेच, पण पिण्याचे पाणी बांधकामासाठी मोट्या प्रमाणात वापरेल जाते त्यावरही बंधन आणले आहे.

शहरातील ८ मैला शुद्धीकरण केंद्रातून सुमारे ४०० ते ४५० एमएलडी पाणी शुद्ध करून पुन्हा नदीत सोडले जाते. हे शुद्ध केलेले पाणी बांधकामासाठी वापरता येणे शक्य आहे. त्यामुळे महापालिकेने वारंवार बांधकाम व्यावसायिकांना त्याबाबत आदेश दिले होते. पण त्याकडे दुर्लक्ष करून सर्रास पिण्याचे पाणी वापरले जात होते. अखेर कारवाईचा इशारा दिल्यानंतर महापालिकेच्या या आवाहनाला प्रतिसाद मिळाला आहे.

सांडपाण्याचा पुनर्वापर करण्याच्या उद्देशाने पुणे पालिकेने एसटीपी टँकर नावाचे ॲप विकसित केले आहे. आत्तापर्यंत त्यावर आत्तापर्यंत एकूण १४७ टँकरधारक, ७६५ बांधकाम व्यावसायिकांनी नोंदणी केली आहे. या अॅपमार्फत एकूण ७६५ बांधकाम व्यवसायिकांना १४७ टँकर ८ सांडपाणी प्रकल्पाच्या माध्यमातून ४ लाख ९० हजार लिटर पाण्याचा बांधकामासाठी वापर केला आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()