कात्रज : दक्षिण पुण्यात मोठ्या प्रमाणांत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांना पाणीपुरवठा सुरळित होत नसताना मात्र, प्रशासनाने केलेल्या दुर्लक्षामुळे राजस सोसायटीकडून लेकटाऊन सोसायटीकडे जाणाऱ्या रस्त्यावर गंगा ओसियन सोसायटीजवळ पाणी सोडण्याच्या वॉलमधून मोठ्या प्रमाणावर पाणीगळती झाली. त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेले. ही पाणीगळती एवढ्या मोठ्या प्रमाणावर होती की, हे पाणी रस्त्यावरून वाहत जाऊन पुढे लेकटाऊन सोसायटीजवळील ओढ्यात मिसळत होते.
परिसरात पाणीसंकट निर्माण झाले असून नागरिकांच्या सातत्याने तक्रारी येत आहेत. मागील काही दिवसांत पाणीचोरी केली जात असल्याचा आरोपही करण्यात आला होता. मात्र, त्यानंतरही प्रशासनाला जाग न आल्याचे हे उदाहरण आहे. अशा प्रकारे कोणत्याही ठिकाणी होत असलेलली पाणी गळती थांबविल्यास आपोआप पाणीप्रश्न सुटण्यास मदत होईल असे नागरिकांचे म्हणणे आहे. याठिकाणी होत असलेल्या पाणी गळतीबाबत नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी मोठ्या प्रमाणांवर नाराजी असून अशा प्रकारची गळती थांबवायला हवी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
सदरील पाणी गळतीसंदर्भात अधिकाऱ्यांशी आम्ही संपर्क केला असता त्यांनी याची दखल घेतली, मात्र तोपर्यंत बराच उशीर झालेला होता. जागरूक नागरिकांनी त्यांचे कर्तव्य म्हणून अशा घटना दिसून आल्यास त्यांनीही तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधायला हवा. तसेच प्रशासनानेही अशाप्रकारे गळती होऊ नये यासाठी प्रयत्न करायला हवेत. जेणेकरून पाणीगळती कमी होईल आणि पाणीटंचाई निर्माण होणार नाही - गणेश निगडे, सचिव, गंगा ओसियन सोसायटी संबधित वॉलवरून पाणीगळती होत असल्याची माहिती मिळाल्यावर तत्काळ पाणीपुरवठा बंद करून दुरुस्ती करण्यात आली. यापुढे अशा प्रकारच्या घटना होणार नाहीत याची काळजी घेण्यात येईल.
- संदीप मिसाळ, शाखा अभियंता, पाणीपुरवठा विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.