Cantonment Pune : रस्त्यावर वाहत आहे भरभरून मैलापाणी ; नागरिकांच्या आरोग्यासह अपघाताचा धोका वाढला

चर्च रोड, जीपीओ समोर असलेल्या चौकात मोठ्या प्रमाणात चेंबर मधून मैलापाणी रस्त्यावर वाहत आहे. त्यामुळे परिसरात मोठी दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
pune
punesakal
Updated on

कॅन्टोन्मेंट : चर्च रोड, जीपीओ समोर असलेल्या चौकात मोठ्या प्रमाणात चेंबर मधून मैलापाणी रस्त्यावर वाहत आहे. त्यामुळे परिसरात मोठी दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. रस्त्यावर मोठ्याप्रमाणात मैला वाहत असल्याने दररोज अनेक छोटे मोठे वाहने घसरणे, अंगावर मैला उडणे, पायी चालताना घसरून पडल्याने अपघाताचा धोका वाढत असल्याची तक्रार पुणे चौपाटी दुकानदार युनियनचे प्रमुख सल्लागार कविराज संघेलिया व जनसेक्रेटरी संजय मारणे यांनी केली आहे.

संघेलिया म्हणाले की 2018 पासून या समस्येकरिता वारंवार लेखी व तोंडी अर्ज करण्यात आले आहे. कुठलेही अधिकारी दाद देत नाही. याठिकाणी न्यूक्लिअस मॉल इमारतीत 26 खाद्यपदार्थ गळ्यांची चौपाटी आहेत. आमच्यासह इतर जनसामान्य नागरिकांनाही हा त्रास सोसावा लागत आहे. तक्रार केल्यावर फक्त वरच्यावर ड्रेनेजची स्वच्छता केली जाते, नंतर परिस्थिती जैसे थे पाहायला मिळते. या समस्येवर ठोस उपाय योजना करणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा यावेळी संघेलिया यांनी दिला आहे.

यासंदर्भात कनिष्ठ अभियंता स्नेहल पाटील म्हणाले की,

नवीन लाईन काही ड्रेनेज लाईन चा कालपासूनच माझ्याकडे चार्ज आला आहे. सकाळी त्या ठिकाणी लाईन साफ करून घेतली आहे. ही लाईन जुनी आहे . नवीन लाईन टाकण्यासंदर्भात माझ्याकडे अद्याप प्रस्ताव आलेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.