Pune : वीज पुरवठा खंडित झाल्याने पाण्याची समस्या उद्भवली

सिंहगड रस्ता भागातील सोसायटीच्या परिसरात वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे मात्र काही भागात पूरसदृश्य परिस्थिती नसताना देखील वीजपुरवठा खंडित केला गेला आहे
Pune
Pune sakal
Updated on

सिंहगड रस्ता : सिंहगड रस्ता भागातील सोसायटीच्या परिसरात वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे मात्र काही भागात पूरसदृश्य परिस्थिती नसताना देखील वीजपुरवठा खंडित केला गेला आहे

परिणामी नागरिकांना पाण्याची मोटर सुरू करता येत नाही त्यामुळे सोसायटीत पाणी नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे याबाबत महावितरणचे अधिकाऱ्यांशी संपर्क साधला मात्र त्यांची प्रतिक्रिया मिळाली नाही .

दरम्यान धायरी - नऱ्हे भागातील परांजपे अभिरुची या सोसायटीच्या पार्किंग मध्ये पाणी शिरले. आहे सुमारे एक ते दीड फूट पाणी सोसायटीच्या पार्किंग मध्ये आहे. या ठिकाणी तीन इमारती असून 470 हून अधिक सदनिका आणि दुकाने आहेत.

परंतु योग्य नियोजन नसल्याने तसेच नऱ्हे येथे ओढ्याच्या कडेला झालेल्या बेसुमार अनाधिकृत बांधकामांमुळे पाण्याचा योग्य प्रकारे निचरा होऊ शकला नाही. परिणामी परांजपे अभिरुची परिसरात पाणी साचले आहे. लिफ्टच्या डक्ट मध्ये पाणी साचल्याने सोसायटीची लिफ्ट बंद आहे. अशी माहिती सोसायटीच्या वतीने देण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.