Water Shortage : खराडीत ऐन सणासुदीत पाणीटंचाई; चार दिवसांपासून पाणीच नाही

ऐन सणासुदीच्या काळात पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
Water Shortage
Water Shortageesakal
Updated on

वडगाव शेरी - खराडी येथील वृंदावन सोसायटी मधील गल्ली नंबर दोन मध्ये गेले चार दिवसापासून पाणी पुरवठा झालेला नाही. ऐन सणासुदीच्या काळात पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

वृंदावन सोसायटी येथील 15 ते 20 घरांना गेल्या पाच महिन्यांपासून अपुरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी क्षेत्रीय कार्यालय तसेच पाणीपुरवठा अधिकारी कर्मचारी यांना ही समस्या सांगितली. मात्र पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून फक्त आश्वासनेच मिळाली.

अगोदर कमी वेळ आणि कमी दाबाने होणारा अपुरा पाणीपुरवठा गेल्या चार दिवसांपासून पूर्ण थांबला आहे. चार दिवसांपासून येथील नळाला एक थेंब सुद्धा पाणी आलेले नाही. नवरात्रात पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे येथील नागरिकांना विकतचे पाणी घेण्याची वेळ आली आहे. सणासुदीचा काळ असल्यामुळे खाजगी पाणीपुरवठा दार अडवणूक करून पाणी विकत आहेत.

याविषयी बोलताना येथील रहिवासी दिपा चव्हाण म्हणाल्या, पुणे महानगरपालिकेला आम्ही अनेकदा विनंती केली. अधिकाऱ्यांशी आणि स्थानिक राजकीय पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून पुरेसा पाणीपुरवठा करण्याची मागणी केली. मात्र पाणीपुरवठा सुरळीत होऊ शकला नाही. अधिकारी फक्त आश्वासने देतात. पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास आम्ही हंडा मोर्चा काढणार आहोत.

पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता अन्वर मुल्ला म्हणाले, चार दिवसांपूर्वी रस्त्याच्या कामामुळे नादुरुस्त झालेली जलवाहिनी दुरुस्ती करता काम सुरू होते. त्यामुळे नंतरच्या काळात पाणीपुरवठा सुरळीत होण्यास अडचणी आल्या. वृंदावन सोसायटीत नक्की कशामुळे पाणीपुरवठा होत नाही याची माहिती घेऊन योग्य त्या उपाययोजना करतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.