Water Shortage : पुणे जिल्ह्यात पाणीबाणी! गावे व वस्त्यांमध्ये टँकर सुरू करण्याची वेळ आली प्रशासनावर

पुणे जिल्ह्यातील सर्व धरणांमध्ये पाण्याचा साठा चिंताजनक आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच अनेक गावे व वस्त्यांमध्ये टँकर सुरू करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.
Water Shortage in pune district
Water Shortage in pune districtsakal
Updated on

पुणे - जिल्ह्यातील सर्व धरणांमध्ये पाण्याचा साठा चिंताजनक आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच अनेक गावे व वस्त्यांमध्ये टँकर सुरू करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. जिल्हा प्रशासनाने याची गंभीर दखल घेत तीन महिन्यांऐवजी एक महिन्याचा टंचाई कृती आराखडा तयार करण्याचे काम हाती घेतले आहे.

पुणे शहराला पंधरा जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा खडकवासला प्रकल्पात राखीव ठेवला असला तरी सध्याची परिस्थिती पाहता पाणी काटकसरीने वापरावे, अशा सूचना पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेला देण्यात आल्या आहेत, असे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी सोमवारी सांगितले.

तसेच पाण्याची गंभीर परिस्थिती विचारात घेऊन तीन महिन्यांऐवजी एक महिन्याचा टंचाई कृती आराखडा तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे, असेही ते म्हणाले.

एका बाजूला लोकसभा निवडणुकीची पूर्वतयारी सुरू असताना दुसऱ्या बाजूला पाणीटंचाईच्या परिस्थितीवरही जिल्हा प्रशासन लक्ष ठेवून आहे, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. दिवसे म्हणाले, ‘बांधकामांसाठी वापरण्यात येणारे पिण्याचे पाणी थांबविण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांना दिल्या आहेत. तसेच एक महिन्याचा टंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे.

यामध्ये पिण्यासाठी पाण्याचे नियोजन, चारा छावणीबाबतचे नियोजन आणि पशुधनासाठी पाण्याचे नियोजन करण्यात येत आहे. पुरंदर तालुक्यातील काही दुष्काळी गावांमध्ये चारा छावणी सुरू करावी लागू शकते. यासाठी गावात पाहणी करून सुका आणि ओला चार किती आहे याची माहिती घेण्यात येत आहे. या दोन्ही शहरांनी पाणी जपून वापरावे, जेणेकरून पाण्याची बचत होऊन त्यातून जिल्ह्यातील गावांना पाणी देणे शक्य होणार आहे.’

अशी आहे स्थिती

  • पुणे जिल्ह्यातील ८१ गावे आणि ५३३ वाड्या-वस्त्यांना १०८ टँकरद्वारे पिण्याचे पाणी

  • सुमारे एक लाख ६४ हजार २५ लोकसंख्येला टँकरच्या पाण्याचा पुरवठा

  • जिल्ह्यात सर्वाधिक ५१ टँकर पुरंदर तालुक्यात

  • बारामती तालुक्यात २१ टँकर

  • आंबेगाव, शिरूर तालुक्‍यात प्रत्‍येकी १० टॅंकर

  • दौंड येथे ६, हवेली ४, इंदापूर १, जुन्नर येथे ५ टॅंकर सुरू

  • भोर, खेड, मावळ, मुळशी, वेल्‍ह्यात एकही टॅंकर नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.