Ajit Pawar: खडकवासल्यातून इंदापूरसाठी पाणी सोडण्यात यावे, आमदारांनी केली पवारांकडे मागणी

तीव्र टंचाई जाणवत आहे तसेच दुष्काळामुळे तालुक्याच्या विविध भागात शेतकऱ्यांची हाता-तोंडाशी आलेली पिके जळून जाण्याच्या मार्गावर आहेत |Severe shortage is being felt and due to drought, farmers' hand-to-mouth crops are on the verge of being burnt in various parts of the taluka.
Ajit Pawar: खडकवासल्यातून इंदापूरसाठी पाणी सोडण्यात यावे, आमदारांनी केली पवारांकडे मागणी
Ajit Pawar indapursakal
Updated on

Indapur News: इंदापूर तालुक्यामध्ये सध्या दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली असून शेतीच्या पाण्याबरोबरच पिण्याच्या पाण्याची ही तीव्र टंचाई जाणवत आहे तसेच दुष्काळामुळे तालुक्याच्या विविध भागात शेतकऱ्यांची हाता-तोंडाशी आलेली पिके जळून जाण्याच्या मार्गावर आहेत. (marathi news)

या पार्श्वभूमीवर माजी राज्यमंत्री व इंदापूर आमदार दत्तात्रय भरणे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे खडकवासल्यातून इंदापूर साठी पाणी सोडण्याची आग्रही मागणी केली आहे. याबाबतचे निवेदन हे उपमुख्यमंत्री पवार यांना दिले आहे.(ajit pawar indapur )

याबाबत माहिती देतानाआमदार दत्तात्रय भरणे म्हणाले की गेल्या वर्षीच्या कमी पर्जन्यमानामुळे जवळपास सगळीकडचेच नैसर्गिक स्रोत यंदा लवकर आटल्याने तालुक्यावर दुष्काळाचे सावट पडले असुन अनेक ठिकाणच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना बंद पडल्या आहेत. त्याचबरोबर तालुक्यातील ब-याच भागातील उन्हाळी पिके जळून चालली आहेत.तसेच पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या गावोगावी निर्माण झाली आहे.

यामध्ये विशेषतः तालुक्यातील शेटफळ गढे, लामजेवाडी, निरगुडे, म्हसोबाचीवाडी, लाकडी, वायसेवाडी, कळस, पिलेवाडी, गोसावीवाडी, रूई, थोरातवाडी, मराडेवाडी, बोराटवाडी, कौठळी, बळपुडी, खामगळवाडी, बिजवडी, पोंदकुलवाडी, तरंगवाडी या गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवत असुन सध्या या परिसरात पाण्याचे टँकर चालू आहेत.त्यामुळे दुष्काळाचे गांभीर्य लक्षात घेऊन खडकवासल्यातुन इंदापुरसाठी पाणी सोडण्याची मागणी पालकमंत्री अजित पवार यांना केली आल्याचेही आ. दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.(marathi Ajit pawar News)

खडकवासला कालव्याला पाणी आल्यास शेतकऱ्यांना दिलासा..

इंदापूर तालुक्याच्या अनेक भागात दुष्काळाची तीव्र स्थिती निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर जर खडकवासल्या कालव्यातून इंदापूर साठी पाणी आले तर तालुक्यातील दुष्काळाचे तीव्रता कमी होईल आणि बळीराजाला दिलासा मिळेल. यामुळेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाण्याबाबत आग्रही मागणी केली आहे.(datta bharne)

आ. दत्तात्रय भरणे 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.