खडकवासला - पानशेत धरण खोऱ्यात पावसाच्या सरी पडत असल्याने पाटबंधारे विभागाने येथील विसर्ग दोन हजार क्युसेकवरून पाच हजार 248 क्युसेकपर्यंत वाढविला आहे. हे पाणी खडकवासला धरणात जमा होत असले, तरी येथे पाऊस नसल्याने येथील विसर्ग नऊ हजार 416 क्युसेकवर नियंत्रित आहे.
पानशेत धरणात 29 जुलैला सर्वांत कमी म्हणजे 4.31 टीएमसी म्हणजे 40.51 टक्के पाणी शिल्लक होते. हे धरण 17 ऑगस्टला 10.65 टीएमसी पाणी जमा झाल्याने शंभर टक्के भरले. त्यादिवशी दोन हजार क्युसेकने विसर्ग आंबी नदीत सोडला.
हा विसर्ग आज सायंकाळी पाच वाजता चार हजार 648 क्युसेक आणि वीजनिर्मितीसाठी 600 क्युसेक करण्यात आला. पानशेतमधून एकूण पाच हजार 248 क्युसेक पाणी खडकवासला धरणात जमा होत आहे. फक्त खडकवासला धरणाचा येवा (येणारे पाणी) चार हजार 168 क्युसेक आहे. पानशेत व खडकवासला मिळून असलेला येवा धरणातून नऊ हजार 416 क्युसेक पाणी मुठा नदीत सोडला जात आहे. खडकवासला धरणातील विसर्ग नियंत्रित केला जात आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
बुधवारी सकाळी सहा ते सायंकाळी पाच वाजता या अकरा तासांत खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात एक मिलिमीटर, पानशेत आणि वरसगाव 8, टेमघर येथे 20 मिलिमीटर पाऊस झाला. खडकवासला धरण प्रकल्पांतील चार धरणांतील एकूण पाणीसाठा 26.90 टीएमसी म्हणजे 92.29 टक्के आहे.
उजनीतील पाणीसाठा 60 टक्क्यांवर
जिल्ह्यात सध्या पानशेत, कळमोडी, नाझरे आणि आंद्रा ही धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत, तर भाटघर, नीरा देवधर, वीर, वडज, कासारसाई, खडकवासला, गुंजवणी ही धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणातील पाणीसाठा 60 टक्क्यांवर पोचला आहे.
इतर धरणांतील पाणीसाठा (टक्केवारी)
भामा-आसखेड - 5.80 (75.61)
पवना - 6.55 (77.02)
मुळशी - 18.14 (98.28)
भाटघर - 23.16 (98.53)
नीरा देवधर - 10.44 (89.03)
वीर - 8.97 (95.35)
डिंभे - 9.80 (78.46)
कळमोडी - 1.51 (100)
आंद्रा - 2.92 (100)
उजनी - 32.10 (59.91)
धरणाचे नाव - पाणीसाठा (टीएमसी) आजअखेर जमा साठा/टक्केवारी
खडकवासला - 1.97/1.97/100
पानशेत -10.65/10.65/100
वरसगाव - 12.83/11.55/90.12
टेमघर - 3.71/2.73/73.58 -
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.