Water Supply : पुण्यात दर गुरुवारी पाणीपुरवठा राहणार बंद

पुणेकरांनो पाणी जपून वापरा! पुणे महापालिकेने टप्प्याटप्प्याने पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे.
water supply
water supplyesakal
Updated on
Summary

पुणेकरांनो पाणी जपून वापरा! पुणे महापालिकेने टप्प्याटप्प्याने पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे.

पुणे - पुणेकरांनो पाणी जपून वापरा! पुणे महापालिकेने टप्प्याटप्प्याने पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी पुढील आठवड्यापासून (गुरुवार ता. १८) होणार आहे. आठवड्यातून एकदा म्हणजे दर गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. दरम्यान, ३१ जुलैपर्यंत पाणी पुरवायचे असल्यास महापालिकेने दहा टक्के पाणीकपात आणि पाणी जपून वापरण्याबाबत जलसंपदा विभागाकडून कळविण्यात आले आहे.

यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. या पार्श्वभूमीवर खडकवासला धरणसाखळीतील उपलब्ध पाणीसाठा विचारात घेऊन महापालिकेने पुढील काळातील पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यासाठी पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार आणि पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी मंगळवारी ही माहिती दिली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच कालवा समितीची बैठक झाली होती.

सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी ‘एअर व्हॉल्व्ह’

पावसकर म्हणाले, ‘‘जलवाहिन्यांत ‘एअर ब्लॉक’ येत असल्यामुळे पाणीपुरवठा विस्कळित होतो. ही अडचण दूर करण्यासाठी ‘एअर व्हॉल्व्ह’ बसवून तो सुरळीत करता येऊ शकतो, असे निदर्शनास आले आहे.

एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्या भागातील पाणीपुरवठा विस्कळित होतो, अशी वीस ठिकाणे महापालिकेने निश्‍चित केली आहेत. त्या ठिकाणी ‘एअर वॉल्व्ह’ बसविण्यात आले आहेत. त्यामुळे तो पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी मदत होईल. तसेच या भागात पर्यायी व्यवस्था म्हणून टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जाईल.

०.२५ टीएमसी बचत होणार

आजच्या घडीला खडकवासला धरणसाखळीतील चार धरणांत मिळून ९.७८ टीएमसी इतका पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी आजच्या दिवशी ९.२० टीएमसी इतका साठा शिल्लक होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठा अर्धा टीएमसीने अधिक असला तरी, हवामान खात्याच्या अंदाजानुसार, यंदा मॉन्सून उशिरा दाखल होऊन पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे. पहिल्या टप्प्यात आठवड्यातून एकदा पाणीकपात करण्यात येणार असून, यातून दरमहा ०.२५ टीएमसी एवढी पाण्याची बचत होणार आहे.

महापालिकेत झालेल्या आणि कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत धरणांमधील उपलब्ध पाणीसाठा १५ जुलैपर्यंतच पुरेल, असे जलसंपदाकडून सांगण्यात आले. यंदा विलंबाने मोसमी पाऊस सक्रिय होणार असल्याचा अंदाज पाहता ३१ जुलैपर्यंत पाणी पुरवायचे असल्यास महापालिकेने दहा टक्के पाणीकपात करावी आणि पाणी जपून वापरण्याबाबत कळविण्यात आले होते. पाणीकपात करायची किंवा कसे, याबाबतचा निर्णय महापालिकेने घेण्याचेही सांगण्यात आले होते.

- ह. वि. गुणाले, मुख्य अभियंता, जलसंपदा, पुणे विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.