Pune News : संतोषनगरमध्ये सलग चार दिवस पाणीपुरवठा विस्कळित

पंपिग स्टेशनमधील बिघाडाचा फटका; पाचव्या दिवशीही पाणी मिळण्याची शक्यता धूसर
Water supply disrupted Santoshnagar for four days katraj water crisis pune
Water supply disrupted Santoshnagar for four days katraj water crisis punesakal
Updated on

कात्रज : पंपिग स्टेशनवरील संतोषनगर आणि आगममंदिर परिसरात पाणीपुरवठा करणाऱ्या पंपामध्ये बुधवारी दुपारी अचानक बिघाड झाल्याने पाणीपुरवठा विस्कळित झाला. गेले चार दिवस संतोष नगर, अंजनी नगर, जैन मंदिर, आगम मंदिर आणि वाघजाईनगर परिसरातील पाणीपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले आहेत.

मागील चार दिवसांपासून वेळेवर टँकरही मिळत नाही. तर, टँकर आला तर त्याठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणांवर गर्दी होत असल्याचे दिसून येते. बुधवारी बिघाड झाल्यानंतर महापालिकेच्या विद्युत विभागाकडून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. मात्र, पर्यायी पंपामध्येही बिघाड असल्याने आहे तोच पंप दुरुस्त करण्यास महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना चार दिवस लागले. त्यामुळे बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारी असा चार दिवस पाणीपुरवठा खंडित होता.

त्यात शनिवारी पंप दुरुस्त केल्यानंतर सायंकाळी पाणीपुरवाठा सुरु करण्यात आला असला तरी आज म्हणजेच रविवारी पाचव्या दिवसीही काही भागात पाणीपुरवठा सुरळित होण्याची शक्यता धूसर आहे. पाणी हे जीवनावश्यक असताना अशा ठिकाणी महापालिकेकडील यंत्रामध्ये बिघाड झाल्यास पर्यायी व्यवस्था नसणे किंवा बिघाड झालेले यंत्र वेळेत दुरुस्त न करणे हे किती धोक्याचे आहे याचा प्रत्यय संतोषनगर परिसरातील नागरिकांना आला.

केवळ प्रशासनाच्या हलगर्जीपणांमुळे सातत्याने पाणीपुरवठा विस्कळित होत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. यामुळे अनेक नागरिकांना टँकर विकतही मागवावा लागला असल्याचे नागरिकांनी सांगितले.

बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास अचानक संतोषनगर, आगममंदिर परिसरात पाणी पुरवठा करणाऱ्या पंपाचा शाफ्ट तुटला. त्यामुळे पाणीपुरवठा विस्कळित झाला. बदली पंपातही बिघाड होता. त्याचे काम चालू असल्याने पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देता आली नाही. त्यामुळे पाणीपुरवठा करता आला नाही.

आता पंपची दुरुस्ती करण्यात आली आहे. - प्रमोद हुगे, उपअभियंता, विद्युत विद्युत विभागाकडून शनिवारी उशिरा यंत्रातील बिघाड दुरुस्त करण्यात आला आहे. आम्हाला पाणीपुरवठा सुरळित करण्यासाठी किमान २४ तासांचा अवधी लागेल.

- कुणाल यादव, शाखा अभियंता, पाणीपुरवठा विभाग

चार दिवसांपासून आमच्या भागात पाणीपुरवठा न झाल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले. महापालिकेकडून टँकरनेही हवा तसा पाणीपुरवठा करण्यात आला नाही. अनेकांना स्वखर्चाने टँकर मागवावे लागले. यापुढे अशा प्रकारची घटना घडू नये किंवा पाणीपुरवठा विस्कळीत होऊ नये यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल.

- राजू कदम, स्थानिक नागरिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.