पुणे - शहराच्या विविध भागांमध्ये सलग दुसऱ्या दिवशी पाणी पुरवठा विस्कळित होता. अनेक भागांमध्ये दोन दिवसांपासून पाणी पुरवठा न झाल्याने दैनंदिन वापरासाठी लागणाऱ्या पाण्यासाठी नागरीकांना अक्षरशः वणवण करावी लागली..शहराच्या वेगवेगळ्या भागातील जलकेंद्राच्या तातडीच्या देखभाल दुरुस्ती, पंपिंग, विद्युत विषयक कामासाठी गुरुवारी शहरातील बहुतांश भागातील पाणी पुरवठा महापालिका प्रशासनाने बंद ठेवला होता. तर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी पाणी उशिरा व कमी दाबाने येणार असल्याचे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने जाहीर केले होते.प्रत्यक्षात काही भागांमध्ये शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत तर, अनेक भागांमध्ये शनिवारी दुपारी तीन वाजेपर्यंत पाणी पोचले नव्हते. बिबवेवाडी गावठाण, बिबवेवाडी ओटा, अप्पर इंदिरानगर, जेधेनगर, पाफळ वस्ती, शेळके वस्ती, वारजे माळवाडी, पॉप्युलरनगर, अतुलनगर, रामनगर, गार्डन सिटी, रुणवाल सोसायटी या भागासह शहरातील अनेक भागांमध्ये पाणी न आल्याने नागरिकांची गैरसोय झाली..कमी दाबाने पाणी पुरवठा झाल्याने सोसायट्यांच्या पाण्याच्या टाक्या भरल्या नाहीत. तर वस्त्यांमध्ये दोन दिवस पाणी पुरवठा न झाल्याने नागरिकांवर पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली.'आमच्याकडे दोन दिवसांपासून पाणी आले नाही. दररोज रात्री दहा ते पहाटे चारपर्यंत पाणी राहते. बुधवारी मध्यरात्री पाणी आले नाही. त्यानंतर गुरुवारी पाणी पुरवठा बंद होता, त्यामुळे गुरुवारी रात्री पाणी मिळाले नाही, शुक्रवारी रात्री कमी दाबाने पाणी आले. स्वयंपाक, अंघोळ, भांडी, शौचालयासाठी देखील पाणी नव्हते.'- राजेश निकम, बिबवेवाडी..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.