मुळशी धरणातून उद्या होणार विसर्ग; मुळा नदीकाठच्यांना सतर्कतेचा इशारा!

Mulshi_Dam
Mulshi_Dam
Updated on

माले (पुणे) : मुळशी धरण परिसरात सात-आठ दिवसांपासून सुरु असलेल्‍या जोराच्‍या पावसामुळे मुळशी धरण सुमारे ८५ टक्‍के भरले आहे. पावसाचा जोरही कायम आहे. त्यामुळे रविवार (ता.१६) सकाळी ११ वाजल्‍यापासून मुळशी धरणातून मुळा
नदीत पाणी सोडण्‍यास सुरवात करण्‍यात येणार आहे. त्‍यामुळे
नदीपात्रालगतच्‍या गावांना सतर्कतेचा इशारा देण्‍यात आला आहे.

मुळशीच्‍या पश्चिम पट्ट्यातील घाटमाथ्‍यांवरील ताम्हिणी घाट, पिंपरी, दावडी, आंबवणे, शिरगाव परिसरात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. जोराच्‍या पावसामुळे शनिवारी सकाळपर्यंत मुळशी धरण सुमारे ८५ टक्‍के भरले असून ४४२.९० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा झाला आहे. त्‍यामुळे रविवार (ता.१६) सकाळी ११ वाजल्‍यापासून धरणातून मुळा नदीत नियंत्रित विसर्ग सुरु करण्‍यात येणार आहे.

धरणक्षेत्रात पावसाचा जोर कमी-जास्‍त होत असल्‍याने
त्‍यानुसार विसर्गही कमी-जास्‍त करावा लागतो. विसर्गामुळे नदीकाठच्‍या गावांना सतर्कतेचा इशारा देण्‍यात आला आहे. नदीकाठच्‍या मोटारी काढणे, गुरांना नदीपात्रापासून लांब ठेवणे, नदीपात्रात प्रवेश न करणे आदी सुरक्षिततेच्‍या सूचना टाटा कंपनी आणि प्रशासनाने दिल्‍या आहेत.

मुळशी धरण परिसरात शनिवारी सकाळी सात वाजेपर्यंत झालेला पाऊस पुढील प्रमाणे : 

कंसात या हंगामातील एकूण पाऊस - सर्व आकडे मिलीमीटरमध्‍ये :- 

ताम्हिणी - २२८ (५२३५) 

शिरगाव - २१२ (४२१७) 

दावडी - २०६ (३९५७) 

आंबवणे - १६२ (३४४८) 

माले - ९२ (१६४९)

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.