Waterfall : हिरवेगार डोंगर, घाटमाथ्यावरचे धुके अन् अंगाला झोंबणारा वारा; गडांवर पर्यटकांची गर्दी

वेल्ह्यातील स्थळांना पर्यटकांची पसंती
Waterfall
WaterfallSakal
Updated on

वेल्हे - हिरवेगार झालेले डोंगर, घाटमाथ्यावर जमा झालेले धुके, शेकडो लहान-मोठे प्रवाहित झालेले धबधबे ,अंगाला झोंबणारा वारा व पावसात भिजत वर्षाविहाराचा आनंद घेणारे हजारो पर्यटकांची पाऊले आपोआप वळतात निसर्गाच्या कुशीत सह्याद्रीच्या रांगेत वसलेल्या वेल्हे तालुक्यातील पर्यटन स्थळांकडे गेल्या काही वर्षापासून तालुक्यातील पर्यटन स्थळांना पर्यटकांकडून पसंती मिळत आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले तर सर्वाधिक काळ स्वराज्याचा राज्यकारभार पाहिलेल्या किल्ले राजगड त्याचबरोबर पुणे जिल्हा व रायगडच्या हद्दीवर असलेल्या केळद येथील लक्ष्मी धबधबा व केळेश्वर धबधब्याला पर्यटकांकडून अधिक पसंती मिळत आहे जोडून आलेल्या सुट्ट्या तसेच साप्ताहिक शनिवार ,रविवार सुट्टी मध्ये हजारो पर्यटक वेल्हे तालुक्यामध्ये दाखल होत आहेत.

Waterfall
Pune News : होर्डिंगच्या स्ट्रक्टरल ऑडिटीची उलट तपासणी

निसर्गाचा अविस्मरणीय आनंद घेण्यासाठी निसर्ग सौंदर्य डोळ्यांमध्ये साठवण्यासाठी तसेच निसर्गाची छबी कॅमेरे टिपण्यासाठी सकाळपासूनच सायंकाळी उशिरापर्यंत पुणे जिल्ह्यासह पर जिल्हे व परराज्यातून नागरिक या ठिकाणी येताना दिसत आहेत.

तालुक्यामध्ये जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत पर्यटक सर्वाधिक हजेरी लावत आहे. डोंगररांगांच्या मधून लहान मोठे धबधब्यांच्या ठिकाणी तसेच कुटुंबासह आलेल्या लहान थोरांसह पावसात चिंब होण्याचा अनेकांना आवरत नाही.

तालुक्यातील या पर्यटन स्थळांबरोबरच पानशेत परिसरातील पानशेत, वरसगाव व गुंजवणी धरणाच्या परिसरात देखील पर्यटकांची मोठी गर्दी होताना दिसत आहे .

याच पार्श्वभूमीवर वेल्हे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत पठारे यांच्यासह पोलीस कर्मचारी ठिकठिकाणी बंदोबस्त ठेवत आहेत सर्वात जास्त गर्दी असणाऱ्या मढे घाट कडे जाणाऱ्या रस्त्यावर गुंजवणी धरणाच्या शेजारी पानशेत येथे पोलीस तपासणी नाका सुरू करण्यात आला असून या ठिकाणी वाहनांची तपासणी करण्यात येत आहे.

कुटुंबासह आलेल्या पर्यटकांना त्रास होऊ नये यासाठी तपासणी नाक्यावर ब्रीद अनालिसिस मशीन द्वारे पर्यटकांची तपासणी करण्यात येत आहे मद्यपी पर्यटकांवर कारवाई करण्यात येत आहे. केळद ग्रामपंचायतच्या हद्दीत वनव्यवस्थापन समितीच्या माध्यमातून उपद्रव शुल्क नाका तयार केला असल्याची माहिती वेल्ह्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी गोविंद लंगोटे यांनी दिली.

Waterfall
Pune News : होर्डिंगच्या स्ट्रक्टरल ऑडिटीची उलट तपासणी

तर केळदचे माजी सरपंच रमेश शिंदे म्हणाले ,'या परिसरातील पर्यटन स्थळांकडे जाणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था झाली असून या ठिकाणी पक्के रस्ते तयार करून ठिकठिकाणी सूचना फलक लावणे गरजेचे आहे.

मढे घाट येथील धबधब्यांवर रॅपलिंग सारख्या साहसी खेळांसाठी बंदी घातली असून या ठिकाणी पर्यटकांनी जीवितास हानी पोहोचेल अशा ठिकाणी जाऊन स्टंट करू नये असे आवाहन तहसीलदार दिनेश पारगे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.