कोकणात जाणाऱ्या महामार्गावर खड्डे

वाहनचालकांना करावी लागतेय तारेवरची कसरत
PUNE
PUNESAKAL
Updated on

पौड : चांदणी चौकातून कोकणात जाणाऱ्या जळगाव ते दिघी पोर्टबंदर हा राष्ट्रीय महामार्गाची ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली आहे. सुतारवाडी (ता.मुळशी) येथील जीवघेण्या खड्ड्यातून वाट काढताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागते. यामुळे सिमेंट काँक्रिटकरणाचे काम पूर्ण होईपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजवावेत, अशी मागणी नागरिकांतर्फे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष महादेव कोंढरे यांनी राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळाकडे केली आहे.

जळगाव ते दिघी पोर्टबंदर हा मार्ग सरकारने राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित केला आहे. हा महामार्ग चांदणी चौकातून मुळशी तालुक्यामार्गे कोकणात जातो. एमएसआरडीसीकडून गेली दोन वर्षांपासून या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. तालुक्यात ठिकठिकाणी दोन्ही बाजूचे सिमेंट काँक्रिटीकरण झाले आहे. तर बहुतांश ठिकाणी एकेरी मार्गाचे काम झाले आहे. काही ठिकाणी मात्र कोणत्याही प्रकारचे काम झाले नाही.

कोरोनाचे निर्बंध शिथिल केल्याने शाळा, औद्योगिक कारखाने, सरकारी कार्यालये, व्यवसाय सुरू झाले आहेत. त्यामुळे कोकण, पुणे शहर, पिंपरी चिंचवड भागातील नोकरदार, व्यावसायिक मंडळी दररोज याच मार्गाने ये जा करतात. खड्ड्यातून वाट काढत जाताना प्रवाशांना शारीरीक व्याधींचाही सामना करावा लागत आहे. त्याचप्रमाणे गाड्यांचेही नुकसान होत आहे. खड्ड्यांमुळे वाहतूक संथ होते. परिणामी कोंडीही वाढत आहे. त्यामुळे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण होईपर्यंत ठिकठिकाणी पडलेले खड्डे बुजवावेत, अशी मागणी त्रस्त वाहनचालक व नागरिकांकडून होत आहे.

PUNE
पुणे : महर्षीनगर विद्युत महावितरण ऑफिसला आग

डान्सिंग कारचा अनुभव

भूगावमध्येच राष्ट्रीय महामार्गावर मोठमोठ खड्डे पडले आहेत. त्यामुळे येथून गाडी चालविताना चालकांना डान्सिंग कारचाच अनुभव येतो. पुढे माताळवाडी फाट्याजवळ एका वळणावरील खड्डे त्रासदायक होत आहेत. लवळेफाटा ते घोटवडे फाट्यापर्यंत खड्ड्यांचे जाळेच पसरले आहे. पिरंगुट पुलावरील लांबलचक पडलेला खड्डा दुचाकी चालकांसाठी जीवघेणा ठरू शकतो. सुतारवाडीजवळही कोणता खड्डा चुकवायचा हाच प्रश्न वालनचालकांना पडत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.