Maharashtra Rain Update : राज्यात पुढचे 2 ते 3 दिवस पडणार मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा अंदाज!

राज्यात मॉन्सूनच्या पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला असून अवघ्या आठवड्याभरात राज्याने सरासरीपेक्षा जास्त पाऊस गाठला
weather update rain forcast next two to three days heavy rain in state Department of Meteorology
weather update rain forcast next two to three days heavy rain in state Department of Meteorologyesakal
Updated on

पुणे : राज्यात मॉन्सूनच्या पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला असून अवघ्या आठवड्याभरात राज्याने सरासरीपेक्षा जास्त पाऊस गाठला आहे. त्यामुळे हवामानशास्त्र विभागाने वर्तविलेला अंदाज खरा ठरत आहे. पुढील दोन ते तीन दिवस राज्यात पावसाचा जोर असाच कायम राहणार आहे. एकीकडे जून महिन्यात दडी मारलेल्या पावसामुळे राज्यात पावसाने सरासरी देखील गाठली नव्हती. दरम्यान जुलै महिन्यात राज्यात सरासरी ते सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दीर्घकालीन अंदाजात दिला होता. त्यानुसार जुलैमध्ये पावसाची दमदार सरी कोसळत असून राज्यात पावसाने सरासरी गाठली आहे. १ जून ते १४ जुलै या कालावधीत राज्यात साधारणपणे ३५० मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद होते.

मात्र यंदा या कालावधीत ५०३.२ मिलिमीटर इतका पाऊस नोंदला गेला असून हा सरासरीपेक्षा ४४ टक्के जास्त आहे. राज्याच्या चार विभागांची स्थिती पाहता मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकणात ही सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये मराठवाड्याने बाजी मारली असून मराठवाड्यात सरासरीच्या तब्बल ८७ टक्के जास्त पाऊस नोंदला गेला आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सरासरी ते सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला असला तरी अद्याप सांगलीमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. मागील आठवड्यापासून मॉन्सून सक्रिय झाल्याने राज्यात सर्वदूर जोरदार पाऊस कायम आहे. संततधार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील घाट माथ्यावर रस्ते खचले. सध्या कोकणातील प्रमुख नद्यांना पूर तर, विदर्भ पूरस्थिती निर्माण झाली. अतिवृष्टीमुळे घाट माथ्यावर ही दरडी कोसळण्याची घटना, रस्ते खचले असून धरणांच्या परिसरात पावसाच्या जोरदार सरी कायम आहेत.

जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त

धुवाधार पावसाच्या सरींमुळे जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा सुमारे ६० टक्के जास्त पाऊस पडला आहे. शहरात देखील पावसाने सरासरी गाठली आहे. गेल्या महिन्यात जिल्ह्याला हुलकावणी दिलेल्या पावसामुळे खरीप पेरणीवर ही याचा परिणाम झाला. जिल्ह्याने सरासरी देखील गाठली नव्हती. मात्र मागील आठ ते दहा दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळे आता सरासरीपेक्षा जास्त पाऊस जिल्ह्यात झाला.

जिल्ह्यातील पाऊस मिलिमीटरमध्ये (जून ते १४ जुलैपर्यंत)

सरासरी - प्रत्यक्षात - टक्केवारी

३२२.९ - ५१२.३ - ५९ टक्के जास्त

राज्यातील विभागनिहाय पावसाची नोंद ( १ जून ते १४ जुलैपर्यंत मिलिमीटरमध्ये) ः

विभाग - सरासरी - प्रत्यक्षात - टक्केवारी

मध्य महाराष्ट्र ३६१.९ २५७.५ ४१

कोकण १५३१.१ ११६३.२ ३२

मराठवाडा ३८७.४ २०७.२ ८७

विदर्भ ४४१ ३०७.२ ४४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.