पुणे : पूर्वी जाडजूड व्यक्तिमत्त्वाला निरोगी, सुखवस्तू आणि धडधाकट आहे, असे समजले जायचे. मात्र, आता ही व्याख्या बदलू पाहत आहे. कारण जीवनशैली बदलानुसार स्थूलता (लठ्ठपणा) सर्वच वयोगटात वाढत असून, तो अनेक आजारांना आमंत्रण नव्हे, तर दहाहून अधिक आजारांना निमंत्रण देणारी जननी ठरत आहे. मुलांमध्येही प्रमाण वाढत असल्याने या लठ्ठपणाला वेळीच ओळखून त्यावर उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.