वडापुरीमध्ये फटाक्यांच्या आतषबाजीत तुळजापूरहून आणलेल्या ज्योतीचे स्वागत

wadapur
wadapur
Updated on

वडापुरी - (ता. इंदापूर ) येथे फटाक्यांच्या आतषबाजी मध्ये तुळजापूर येथून आणलेल्या ज्योतीचे गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. 

वडापुरी, पिंगळेवस्ती, काटी, रेडा, रेडणी, लाखेवाडी, वकीलवस्ती, पंधारवाडी, सुरवड या ठिकाणी देवीची व ज्योतीचे गावातून मिरवणूक काढण्यात आल्या व त्या दोन तीन तास चालू होत्या. पिंगळे वस्ती येथील जय भवानी मित्र मंडळ व वडापुरी येथील इंदिरानगर परिसरातील जय भवानी मित्र मंडळ दर वर्षी प्रमाणे या वर्षी नवरात्रोत्सवा निमित्त तुळजापूर येथून ज्योत आणून रात्री देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात करण्यात आली. यावेळी गावातील महिलांनी देवीची व ज्योतीची पूजा केली. यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यामुळे गावातील वातावरण धार्मिक बनले होते.

या मिरवणुकीत गावातील व वाड्या वस्त्यावरील तरुण सहभागी झाले होते त्यामुळे गावातील वातावरण पूर्णपणे धार्मिक झाले होते. यावेळी सरपंच शिवाजी तरंगे,फिरोज शेख,मुकेश टकले,दत्तात्रेय ढोबळे,दिपक पिंगळे , महादेव तरंगे , संतोष पासगे अमोल पासगे , नितीन म्हस्के, सुनील पिंगळे सुनील कोकरे उपस्थित होते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.