Indapur Incident : कामगार मृत्यू प्रकरणी विहीर मालक व ठेकेदाराविरुध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

विहीर मालकास अटक करण्यात आले असल्याची माहिती येथील भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली
Well Mhsobachiwadi case of culpable homicide registered against owner and contractor worker death crime pune
Well Mhsobachiwadi case of culpable homicide registered against owner and contractor worker death crime punesakal
Updated on

भिगवण : म्हसोबाचीवाडी येथील अजस्त्र विहीरीभोवती रिंग टाकत असताना झालेल्या दुर्घटनेमध्ये चार कामगारांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी शेतजमिनीचे मालक व सदर कामाचा ठेकेदार यांचेविरुध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

यातील विहीर मालकास अटक करण्यात आले असल्याची माहिती येथील भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली आहे. गिरीश विजय क्षीरसागर(वय. ३२ रा. सणसर,ता.इंदापुर) व विश्वास गायकवाड(रा. बेलवाडी,ता.इंदापुर) यांचेविरुध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः म्हसोबाचीवाडी(ता.इंदापुर) येथे गिरीश विजय क्षीरसागर यांचे शेतजमीन गट क्रमांक ३३८ मध्ये अजस्त्र अशा सुमारे १२० फुट व्यास व १२७ फुट खोलीच्या विहीरीभोवती रिंग टाकण्याचे काम सुरु होते.

सदर कामावर जावेद अकबर मुलाणी(वय.३५), सोमनाथ लक्ष्मण गायकवाड(वय. ४०)परशुराम बन्सीलाल चव्हाण(वय. ३०) व लक्ष्मण मारुती सावंत(वय.५१) हे कामगार रिंग टाकण्याचे काम करत होते. सिमेंट कॉक्रीटची रिंग टाकत असताना रिंगच्या बाजुला माती व मुरुम भरलेला आहे.

व त्यामुळे कामगारांच्या जीवास धोका होऊ शकतो व त्यांचा मृत्यू होऊ शकतो याची जाणीव असतानाही सदर आरोपींनी कामगारांना रिंग बांधण्यास लावले. काम सुरु असताना सिमेंट कॉक्रीट रिंगची पुर्व बाजु ढासळुन त्यामध्ये चौघे कामगार १२७ फुट खोल विहीरीमध्ये गाढले गेले. विहीरीमध्ये गाढले गेल्यामुळे कामगारांचा मृत्यू झाला.

कामगारांचे मृतदेह एन.डी.आर.एफच्या सहाय्याने ६६ तासांच्या अथक प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात आले. चार कामगारांच्या मृत्यूस विहीर मालक व ठेकेदार यांना जबाबदार धरुन त्यांच्या विरुध्द सदोष मनुष्यवधाचा गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींपैकी विहीर मालक गिरीश क्षीरसागर यास पोलिसांनी अटक केली असुन दुसऱ्या आरोपींचा शोध घेतला जात आहे.

या प्रकरणाचा अधिक तपास भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रुपेश कदम करीत आहेत. इंदापुर तालुक्यातील म्हसोबाचीवाडी येथील खाणीचे विहीरीत रुपांतर करताना झालेल्या या अपघातामुळे तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक धोकादायक असलेल्या खाणीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रशासन याकडे लक्ष देणार का अशा सवाल सामान्य नागरिकांमधुन व्यक्त होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()