पुणे - भाड्याने किंवा विकत घेण्यासाठी उपलब्ध असलेले घर, दुकान किंवा इतर वास्तूची व त्या परिसराची माहिती नसतानादेखील त्यांचा व्यवहार करणाऱ्या अनेक व्यक्ती शहरात आहेत. त्यांच्याकडून ग्राहकांची फसवणूकदेखील होते. त्यामुळे वास्तू घेताना विश्वासार्ह सल्लागार हवा, ती टिकवून ठेवण्याचे काम "रियलीटर्स इस्टेट असोसिएशन पुणे' (रीप) करीत असल्याचा विश्वास असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
"रिअल इस्टेट कन्सल्टंट'ची संघटना असलेल्या "रियलीटर्स इस्टेट असोसिएशन'च्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच "सकाळ' कार्यालयाला भेट दिली. रिअल इस्टेट कन्सल्टंटला भेडसावणाऱ्या समस्या, त्यावरील उपाय, वास्तू विकत व भाड्याने देताना होत असलेल्या व्यवहारांचे स्वरूप, सध्या या क्षेत्राला मिळत असलेला प्रतिसाद अशा मुद्यांवर यावेळी चर्चा करण्यात आली. "सकाळ'चे संपादक सम्राट फडणीस यांनी स्वागत केले. असोसिएशनचे अध्यक्ष रवी शर्मा, सचिव अमित मेढेकर, खजिनदार आदित्य रेड्डी, सदस्य स्वप्ना राणे, चेतना ढोबळे, ज्योती कुलकर्णी, जयेश जैन, संजय गरगटे, अरुण खानोलकर, सचिन देशपांडे, रवी चव्हाण आदी यावेळी उपस्थित होते.
कोरोनासारखी परिस्थिती पुन्हा निर्माण झाली तर स्वतःचे घर हवेच, या विचाराने सध्या घरखरेदी वाढली आहे. त्यामुळे मार्केटमध्ये सकारात्मक स्थिती आहे. कोरोना पूर्वीच्या तुलनेत घर किंवा व्यावसायिक जागांची चौकशी करण्यासाठी येणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. मात्र, जे कोणी चौकशीला येतात, त्यातील वास्तू घेणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. हे सर्व व्यवहार होत असताना नागरिकांनी पैसे वाचतील म्हणून खात्रीशीर नसलेल्या व्यक्तीच्या माध्यमातून व्यवहार करणे टाळले पाहिजे. कारण कन्सल्टंट ज्याप्रमाणे त्या व्यवहाराची पूर्ण जबाबदारी स्वीकारतो, तशी जबाबदारी रेराकडे नोंदणी नसलेल्या व्यक्त घेऊ शकत नाहीत, असे शर्मा म्हणाले.
रिअल इस्टेट कन्सल्टंट गरजेचे का?
- रेराकडे नोंदणी होताना, त्यांची सत्यता पडताळली जाते
- व्यवहार विश्वसनीय व्यक्तीबरोबर होत असतो
- कागदपत्रांची माहिती मिळते व काढून देण्यात मदत करतात
- भविष्यात काही अडचण आली तर ती दूर करण्याची खात्री मिळते
- आर्थिक किंवा इतर कोणत्याही प्रकारची फसवणूक होत नाही
- वास्तू व त्या परिसरात असलेल्या चांगल्या-वाईट गोष्टींची माहिती मिळते
नावीन्यासह अनुभवही महत्त्वाचा
आर्थिक पाठबळ असल्याने सध्या वास्तू विकत किंवा भाड्याने उपलब्ध करून देणाऱ्या अनेक कंपन्या शहरात स्थापन झाल्या आहेत. वेबसाइटदेखील फोफावत आहेत. त्यांच्यात नावीन्य असले तरी अनुभवाची कमी आहे. कोणत्या ठिकाणी कशा वास्तू उपलब्ध आहेत. मार्केटची स्थिती नेमकी काय, ग्राहकांच्या बदलणाऱ्या अपेक्षा काय व भविष्यात कशी स्थिती असू शकते, या बाबी अनुभवी कन्सल्टंटलाच माहिती असते, असे शर्मा यांनी सांगितले.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.