पुणे : राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पुण्यात कार्यकर्ता मेळावा घेतला. यामध्ये त्यांनी कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला. तसेच दसरा मेळाव्याचा उल्लेख करत आपल्या दसऱ्या मेळाव्याला सर्वाधिक गर्दी होती, पण आपण मार्केटिंगला कमी पडलो असं त्यांनी सांगितलं. तसेच एकनाथ शिंदेंकडं पाहिल्यास बाळासाहेब ठाकरेंचा भास होतो असंही त्यांनी म्हटलं. (When look at Eknath Shinde look like Balasaheb Thackeray says Uday Samant)
सामंत म्हणाले, शिंदे साहेबांनी घेतलेला निर्णय योग्य होता हे आता कळलं आहे. मी लवकरच कात्रजला मेळावा घेणार आहे, कोणीतरी माझ्यावर हल्ला केला म्हणून कात्रजला मेळावा घेणार नाही. 100 दिवसात केलेलं काम मी या मेळाव्यात मांडणार. बाळासाहेबांची शिवसेना पुण्यात वाढवल्याशिवाय राहणार नाही.
तरुणांना उद्योगासाठी १० लाखांचं कर्ज देणार
तरुणांना उद्योगासाठी 10 लाखाचं कर्ज लवकर उपलब्ध करून देणार. पुण्यामध्ये आपल्याला 1,500 उद्योजक निर्माण करायचे आहेत, हे युवा सैनिकांना आता टार्गेट आहे. काही लोक आधी सांगायचे की आम्ही वडापाव खाऊन काम केलं. पण तेव्हा शाखाप्रमुख वडापाव खायचा आणि वरचे लोक बिर्याणी खायचे. आता बिर्याणी वरच्या लोकांनी खाल्ली तर खालचा शाखाप्रमुख देखील बिर्याणीच खाणार. भविष्यत शिंदे साहेब जो उमेदवार देतील त्याला निवडून द्यायचं आहे.
शिंदेकडं पाहिल्यास बाळासाहेबांचा भास होतो
अनेकांनी दसऱ्याच्या दिवशी स्टँडअप कॉमेडी केली, नकला केल्या. आपल्या दसऱ्या मेळाव्याला सर्वाधिक गर्दी होती, पण आपण मार्केटिंगला कमी पडलो. त्यांनी आपल्याला एक शिवी घातली की आपण त्यांना एक विकासकाम दाखवायचं. बाळासाहेबांसोबत काम करू शकलो नाही पण शिंदे साहेबांकडे पाहून बाळासाहेबांचा भास होतो. अडीच वर्षात जे काम झालं नाही ते काल 3 तासांत उपमुख्यमंत्र्यांनी दिल्लीत जाऊन केलं. मुंबई महापालिकेत आम्ही दाखवून देऊ की कोण पळपुटे आहेत. रमेश लटके जर आज जिवंत असते तर त्यांनी देखील शिंदेंना पाठिंबा दिला असता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.