पुणे महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे कारभारी कोण ?

केंद्रीय वैद्यकीय आयोगाने (एनएमसी) पुणे महापालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयात १०० विद्यार्थ्यांना प्रवेश करण्याची परवानगी दिली.
Pune Municipal Corporation
Pune Municipal CorporationSakal
Updated on
Summary

केंद्रीय वैद्यकीय आयोगाने (एनएमसी) पुणे महापालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयात १०० विद्यार्थ्यांना प्रवेश करण्याची परवानगी दिली.

पुणे - केंद्रीय वैद्यकीय आयोगाने (एनएमसी) (NMC) पुणे महापालिकेच्या (Pune Municipal) भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयात (Medical College) १०० विद्यार्थ्यांना (Students) प्रवेश करण्याची परवानगी दिली. त्यादृष्टीने पुढील काही आठवड्यात महत्त्वपूर्ण घडामोडी घडणार असताना १४ मार्च रोजी महापालिकेची मुदत संपणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या वैद्यकीय शिक्षण ट्रस्टवरील पदसिद्ध अध्यक्ष असलेल्या महापौरांसह पक्षनेते व पदाधिकारी अशा १० सदस्यांची मुदत आपोआप रिक्त होतील. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयाचे कारभारी कोण असा हा पेच निर्माण झाला आहे.

पुणे महापालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्टचे पदसिद्ध अध्यक्ष हे महापौर आहेत. तर उपमहापौर, सभागृहनेते, स्थायी समिती अध्यक्ष, विरोधीपक्षनेते हे पदसिद्ध सदस्य आहेत. तर काँग्रेस, शिवसेना, मनसे, एमआयएम, आरपीआय या पक्षाचे गटनेते हे देखील सदस्य आहेत. तर महापालिका आयुक्त हे पदसिद्ध सदस्य, अतिरिक्त आयुक्त हे पदसिद्ध सदस्य सचिव, उपायुक्त सामान्य प्रशासन, पदसिद्ध सदस्य उपायुक्त, आरोग्य प्रमुख, मुख्य लेखा व वित्त अधिकारी असे एकूण १५ जण या ट्रस्टचे सदस्य आहेत.

Pune Municipal Corporation
‘पीएमपी’च्या ताफ्यात लवकरच ५०० ई-बस

पंधरा सदस्यांपैकी अध्यक्ष व ९ सदस्य हे नगरसेवक आहेत. तर पाच जण हे प्रशासनातील अधिकारी आहेत. पुणे महापालिकेची मुदत १४ मार्च रोजी संपणार आहे. त्यामुळे १५ मार्च पासून वैद्यकीय ट्रस्टच्या अध्यक्षांसह त्यामुळे ही १० पदे रिक्त होणार आहेत. त्यामुळे निवडणूका होऊन नवे महापौरांसह गटनेते निश्‍चीत होत नाहीत तो पर्यंत ही पदे रिक्त राहणार आहेत.

महापालिकेची निवडणूक सहा महिन्यांपर्यंत लांबणीवर पडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या काळात आर्थिक निर्णयांसह धोरणात्मक निर्णय ट्रस्टला घ्यावे लागणार आहेत. अध्यक्षांविना हे निर्णय कसे घेणार याचा पेच पडला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

प्रवेश प्रक्रियेसह महाविद्यालयाची तयारी

वैद्यकीय महाविद्यालयाचे शुल्क किती असावे हे अद्याप निश्‍चीत झालेले नाही. शुल्क निश्चितीसाठी उद्या (ता. ९) ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. यामध्ये शुल्काबाबतच निर्णय झाल्यानंतर शुल्क नियंत्रण प्राधिकरण, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची मान्यता घ्यावी लागणार आहे. तसेच महाविद्यालय सुरू करण्यासाठीची तयारीही करावी लागणार आहे. ही सर्व प्रक्रिया प्रशासनाला पूर्ण करावी लागेल. तसेच १५ मार्च पासून निर्णय घेण्याचे अधिकार कोणाला याबाबतही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

‘उद्याच्या बैठकीत शुल्क व इतर मुद्द्यांवर चर्चा केली जाईल. तसेच १५ मार्चनंतर निर्णय कसे घेतले जाणार याची कायदेशीर माहितीही घेतली जाईल.’

- मुरलीधर मोहोळ, महापौर तथा अध्यक्ष, वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.