गुन्हेगारी कुटूंबाच्या संरक्षण व पालन पोषणाची जबाबदारी कोणाची?

तक्रार निवारण दिन, वाद मिटवा; राऊत यांचे आवाहन
गुन्हेगारी कुटूंबाच्या संरक्षण व पालन पोषणाची जबाबदारी कोणाची?
sakal
Updated on

टाकळी हाजी : कोरोनामुळे मानवाच्या आयुष्याचा भरवसा राहिला नाही. त्यात किरकोळ शेती बांधावरच्या भांडणाने वाद विकोपाला जाऊ लागले आहेत. खुन मारामाऱ्या करून आपनच भावी पिढीतील वाद वाढवित आहोत. गुन्हे करत असताना मागील कुटूंबाच्या संरक्षण व पालन पोषणाची जबाबदारी कोणाची? यासाठी नागरीकांनी आपआपसातील वाद सामोपचारांने मिटवून एकोपा टिकवावा. असे आव्हान शिरुरचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी केले.

गुन्हेगारी कुटूंबाच्या संरक्षण व पालन पोषणाची जबाबदारी कोणाची?
गडकरींची दिशाभूल करण्याचा प्रयत्न काही लोक करतायेत: भावना गवळी;पाहा व्हिडीओ

पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक डॅा. अभिनव देशमुख यांच्या आदेशाने गावातील तक्रारी गावातचं मिटव्याव्यात यासाठी आमदाबाद ( ता. शिरूर ) येथे गुरूवार ( ता. 30 ) तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी राऊत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत तक्रारी सोडविल्या.

यावेळी पोलिस हवालदार नाजीम पठाण, पोलिस कॉन्टेबल संतोष भारमळ, अण्णासाहेब कोळेकर, सुरेश नागलोत, अशोक माशेरे, उपसरपंच कांताराम नऱ्हे उपस्थित होते. पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत म्हणाले की, नागरीक अनेक तक्रारी अर्ज पोलिस स्टेशनला देत असतात कामाच्या ताणामुळे ते अर्ज निकाली निघत नाहीत.

गुन्हेगारी कुटूंबाच्या संरक्षण व पालन पोषणाची जबाबदारी कोणाची?
खासदार गवळींना वर्षा बंगल्यावर नो एंट्री? गेटवरूनच परतल्या माघारी

त्यामुळे तक्रार निवारण दिनांच्या निमित्ताने अर्जदार व संबंधीत व्यक्ती यांना बोलावून त्यांचा वाद सामोपचाराने मिटविता येतो. अशा अनेक तक्रार अर्जाचे निवारण करण्यात आले आहे. दैनिक सकाळने "गावातील तंटे गावातच गावातच मिटवा अन कुटूंब वाचवा" या बाबत वृत्त प्रसारत केले होते. यामध्ये राऊत यांनी गुन्हेगारी कुटूंबाची व्यथा मांडली होती. त्यानंतर संपुर्ण राज्यात तक्रार निवारण दिन सुरू झाला असल्याचे निर्दशनास आले आहे.

किरकोळ कारणावरून वाद विकोपाला जातात. त्यातून गुन्हा होऊन काही वेळा कुटूंबातील सर्व सदस्यांना कारागृहात जावे लागते. त्यावेळी कुटूंबाला मदत करायला कोणी येत नाही. त्यामुळे कुटूंबाचा व भविष्यातील पिढीला योग्य संस्कार द्या. त्यातून वाद विकोपाला जाणार नाही. याची दक्षता घ्या. सविंदणे ( ता. शिरूर ) येथील कवी गुलाबराव झेंडे यांनी तक्रारीची कैफियत मांडताच सैन्य दलात काम करत असणाऱ्या मुलगा विशाल झेंडे यास लेह लडाख येथे मोबाईल वरूनसंपर्क साधला. तुम्ही बिनधास्त रहा. तक्रारही सोडवतो. तुमचे आईवडील आमचे आहेत. काळजी करू नका असा आधार दिल्याने पोलिसी खाक्या पेक्षा आधार देणारा पोलिस पाहून उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.