Ajit Pawar Baramati : अजित पवारांना बारामतीत का करावं लागलं शक्तिप्रदर्शन?

Ajit Pawar
Ajit PawarSakal
Updated on

बारामती : राष्ट्रवादी पक्षातल्या फुटीनंतर राज्याच्या राजकारणात सध्या पवार कुटुंबाचीच चर्चा आणि बोलबाला दिसून येत आहे. तरी, पवारांविरोधात भूमिका घेतल्यानंतर जवळपास २ महिन्यांनी अजितदादा आपल्या बारामती मतदारसंघात परतले. पण, यावेळी ते बारामतीला नुसतेच परतले नाहीत तर त्यांच्या कार्यकर्त्यांनी दादांचं स्वागत करण्यासाठी जय्यत तयारी केली होती. अजितदादांना आपल्याच मतदारसंघात परतताना शक्तिप्रदर्शन का करावं लागलं? जाणून घेऊयात...

शरद पवारांचं वाढलेलं वजन

बारामती आणि पवार कुटुंब हे समीकरण राज्याला नवं नाही तसंच देशाला पण नाही. बारामती मतदारसंघाची चर्चा ही कायम देशातील प्रतिष्ठित मतदारसंघांपैकी एक म्हणून केली जाते. तसंच पवार कुटुंबही देशातील पॉवरफुल कुटुंबीयांपैकी एक म्हणून गणले जाते. याच बारामती मतदारसंघातून लढलेल्या निवडणुकांमध्ये विजय मिळवून शरद पवार आमदार, खासदार ते राज्याचे मुख्यमंत्री, देशाचे कृषीमंत्रीही झाले. याच बारामती मतदारसंघातून सध्या सुप्रिया सुळे लोकसभेवर खासदार आहेत आणि संसदेतील कामगिरीतही त्या अव्वल ठरलेल्या आहेत.

तर, आता पवारांची पुढची पिढी म्हणजे त्यांचे नातू रोहित पवारही राजकारणात सक्रीय झाले. पण ते बारामती मतदारसंघातून नाही तर नगर जिल्ह्यातील जामखेड मतदारसंघातून आमदार झालेत.

Ajit Pawar
MP Pritam Munde Video : कार्यक्रमात बोलताना प्रितम मुंडेंच्या डोळ्यात पाणी! गावकऱ्यांचीही मागितली माफी

पवारांना मिळणारी सहानुभूती

राष्ट्रवादी पक्षातील फुटीनंतर आणि काकांची साथ सोडल्यानंतर अजित पवारांना आमदारांचा चांगला पाठिंबा मिळाला म्हणूनच ते शिंदे-फडणवीस सरकारच्या सत्तेत भागीदारही झाले आणि उपमुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर विराजमानही झाले. पण त्यानंतर पवारांचा झंझावात हा येवला, बीड आणि कोल्हापूरच्या सभांमधून पाहायला मिळाला. पवारांच्या तीनही सभा गाजल्या आणि पवारांना मिळणारा प्रतिसाद सर्व राजकीय नेतेमंडळींनी पाहिला, अनुभवलाही.

पवारांच्या १७ ऑगस्टच्या बीडमधील सभेनंतर अजितदादांनीही आपलं वजन वाढवण्याच्या हेतूनं २७ ऑगस्टला बीडमध्ये सभा घेतली. अजितदादांचीही सभा चांगलीच गाजली. पण अजितदादांच्या मंचावरुन तेलगी प्रकरणाचा दाखला देत पवारांवर टीका करणाऱ्या भुजबळांना उपस्थित गर्दीच्या विरोधामुळे आपलं भाषण आटोपतं घ्यावं लागलं होतं.

त्यामुळे अजितदादांना पाठिंबा देत असले तरी कार्यकर्त्यांच्या मनात शरद पवारांबद्दल असलेलं स्थान कमी झालेलं नाही. याशिवाय वयाच्या ८३ व्या वर्षी नव्यानं पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या शरद पवारांना जनमाणसांत चांगली सहानुभूती मिळताना दिसतेय.

Ajit Pawar
Helicopter Crash : रेस्क्यूसाठी गेलेल्या हेलिकॉप्टरला हवेत लागली आग! दुर्घटनेत 2 ठार; थरकाप उडवणारा Video

पवार काकांची आणि निवडणुकीतील पराभवाची भीती

पहाटेच्या शपथविधीचा खुलासाही खुद्द अजितदादांनी मुंबईतील एका कार्यक्रमात केला. कारण २०१९ साली निवडणुकीच्या निकालानंतर जेव्हा भाजपा-शिवसेना युतीचं गणित फिस्कटलं तेव्हा भाजपाला राष्ट्रवादी छुपा पाठिंबा देणार असल्याची चर्चा होती. त्यातूनच पहाटेचा शपथविधी झाल्याचं बोललं गेलं पण पुढे पवारांनी खेळी बदलली आणि अजितदादांना माघार घ्यावी लागली.

त्यावेळीही पवार कुटुंबात फूट पडल्याचं बोललं गेलं पण अजितदादा पक्षात परतले. त्यामुळे आपल्या शब्दावर ठाम असणारे आणि कायम आर-पारचा निर्णय घेणारे अजितदादा मात्र त्यावेळी मोठे व्यथित झालेले दिसले. तरी, यावेळी मात्र अजितदादांनी काकांविरोधात गेल्यानंतर आपला मार्ग कायम ठेवला. त्यामुळे आताच्या विरोधाची भूमिका घेतल्यानंतर अजित पवारांना येत्या निवडणुकीतील पराभवाची अन् काकांच्या राजकीय खेळीची भीती वाटत असावी अशीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.