अरबी समुद्रात गेल्या 4 वर्षात का होतेय चक्रीवादळाची निर्मिती?

हवामानतज्ज्ञांची माहिती, पश्‍चिम किनारपट्टीवर परिणाम
Signs of cyclone formation in Arabian sea
Signs of cyclone formation in Arabian sea
Updated on

पुणे : अरबी समुद्रात गेल्या चार वर्षात मॉन्सूनपूर्व हंगामात सतत चक्रीवादळाची निर्मिती होत आहे. याचा परिणाम भारताच्या पश्‍चिम किनारपट्टी व लगतच्या भागावर दिसून येत आहे. हवामान बदल, समुद्राचे वाढते तापमान आणि हवेतील धूलिकण (एरोसोल) यास कारणीभूत असल्याचे हवामानतज्ज्ञांनी सांगितले आहे.(Why Cyclone have formed in the Arabian Sea in the last 4 years during the pre-monsoon season)

प्रामुख्याने एप्रिल ते जून हा मॉन्सूनपूर्व (प्री मॉन्सून) कालावधी असतो तर अरबी समुद्रात १९८० नंतर पहिल्यांदाच २०१८ ते २०२१ या कालावधीत सलग चार वर्षे चक्रीवादळ निर्माण होत आहे. इतकंच नाही तर ते तीव्र पासून अतितीव्र चक्रीवादळात परिवर्तित झाल्याचे दिसून आले.

वाढत्या तापमानामुळे चक्रीवादळाची निर्मिती

भारतीय उष्णकटीबंधीय हवामानशास्त्र संस्थेच्या (आयआयटीएम) संशोधनाच्या अहवालानुसार मागील काही दशकात अरबी समुद्रासह पश्चिम हिंद महासागराचे तापमान बंगालच्या उपसागराच्या तुलनेत वेगाने वाढले आहे.वारे, तापमान, गुप्त उष्णता या सर्व गोष्टी चक्रीवादळाच्या निर्मितीसाठी कारणीभूत ठरतात.

अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र पूर्वीसुद्धा तयार होत होते. मात्र पोषक वातावरण नसल्यामुळे त्यांचे चक्रीवादळात रूपांतर होण्याचे प्रमाण कमी होते. परंतु आता परिस्थिती बदलली आहे. वाऱ्याच्या माध्यमातून वाहणारे धूलिकण, ब्लॅक कार्बन, तापमानातील वाढ, बाष्पीकरण हे सर्व घटक चक्रीवादळाच्या निर्मितीसाठी ऊर्जेचा स्रोत ठरत आहेत. त्यामुळे आता चक्रीवादळ हे तीव्र ते अति तीव्रमध्ये रुपांतरीत होत असून, वादळी वाऱ्यांमुळे नुकसानीच्या घटना वाढल्या आहेत, असे ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी सांगितले.

''हवामान बदलामुळे समुद्राच्या तापमानात वाढ होत असल्याचे अनेक संशोधनातून स्पष्ट झाले आहे. हा बदल होण्यास काही वर्षांचा कालावधी लागतो. त्यामुळे सध्या चक्रीवादळांच्या निर्मितीसाठी पोषक वातावरण उपलब्ध होत आहे. हवामान बदलामुळेच हा परिणाम होत आहे की नाही, यासाठी पुढील काही काळ याचा अभ्यास करणे गरजेचा आहे.''

- डॉ. शिवानंद पै, प्रमुख, क्लायमेट रिसर्च अँड सर्व्हिसेस, भारतीय हवामानशास्त्र विभाग

मॉन्सूनपूर्व अरबी समुद्रातील चक्रीवादळे

वर्ष चक्रीवादळाचे नाव

२०१८ सागर व मेकुनू

२०१९ वायू

२०२० निसर्ग

२०२१ तोक्ते

तापमानातील ट्रेंडच्या आधारावर अभ्यासातील निष्कर्ष (आयआयटीएम) :

  • चक्रीवादळाच्या निर्मितीसाठी किमान तापमान २७.५ अंश सेल्सिअस असणे आवश्यक.

  • पूर्वी अरबी समुद्राचे किमान तपमान हे पूर्वमोसमी कालावधीत २७ अंश सेल्सिअसहून कमी होते.

  • सध्या अरबी समुद्राचे किमान तापमान ३० ते ३१ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदले जात आहे.

  • गेल्या चार दशकांमध्ये अरबी समुद्राचे किमान तापमान सरासरीपेक्षा १.४ अंश सेल्सिअसने वाढले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.