mathematics
mathematicsSakal

नववीच गणित अवघड का जाते?

नववी गणित भाग एकचे शेवटचे ‘सांख्यिकी’ प्रकरण व भाग दोनचे ‘निर्देशक भूमिती’ प्रकरण की ज्यात विद्यार्थ्यांच्या कृतीला वाव आहे.
Published on

- दिनानाथ द. गोरे

आठवीपर्यंतचे गणित सोपे मध्यम आहे. पण, नववीचे गणित सोपे नाही. अर्थात अवघडही नाही. शिवाय, मोठ्या सुट्टीनंतर १५ जूनला शाळेत आल्यावर, लगेच आठवडाभरात अभ्यास करण्याचा सर्व विद्यार्थ्यांचा मूड (कल) नसतो. या सर्व गोष्टींचा विचार करून ‘आनंददायी शनिवार’ बरोबर ‘आनंददायी गणिते’ उपक्रम राबवायला हवा.

गणिताच्या अभ्यासक्रमाचे वार्षिक नियोजन करताना, सोपी-मध्यम प्रकरणे (पाठ्यपुस्तकातील प्रकरणांचा क्रम न पाहता) जून-जुलै महिन्यात नियोजन करून व गणितातील गमतीजमती अधूनमधून सांगत शिक्षकांनी शिकवली तर आणि तरच सध्याचे गणित सर्वच विद्यार्थ्यांना आवडायला लागेल व जूनपासूनच सर्व विद्यार्थी अभ्यास करण्यास प्रवृत्त होतील.


उदाहरणार्थ ः नववी गणित भाग एकचे शेवटचे ‘सांख्यिकी’ प्रकरण व भाग दोनचे ‘निर्देशक भूमिती’ प्रकरण की ज्यात विद्यार्थ्यांच्या कृतीला वाव आहे. (दोन्ही प्रकरणांत आलेख कागद, पट्टी व पेन्सिलचा वापर करावा लागतो) आणि स्वयंअध्ययनाला पण वाव आहे.

mathematics
Pune News : ‘भिडेवाडा’ची निविदा प्रक्रिया तातडीने राबविण्याचा अजित पवारांचा आदेश

विद्यार्थ्यांना समजायला पण ही प्रकरणे सोपी-मध्यम आहेत. ‘सांख्यिकी’ प्रकरणातील ३० ते ३५ टक्के भाग आठवीत झाला आहे. विद्यार्थ्यांकडे शाळा सुरू झाल्यावर लगेच आलेख कागद नसतील म्हणून ११२ पानावरील सांख्यिकी ‘चला शिकू या’ या पासूनचा भाग १८ जूनपासून शिकवावा.

गणिताचा दैनंदिन व्यवहाराशी संबंध

भाग एक १२७ पानावरील चौथा प्रश्न सोडवून दिल्यावर सर्व विद्यार्थ्यांना या प्रश्नाशी संबंधित वेगळा प्रश्न विचारा की प्रश्नात दिलेले तापमान कोणत्या महिन्यातील असू शकेल? एकूण प्राप्तांकावरून या प्रश्नाचे उत्तर मिळेल.

mathematics
Pune News : आता बार काउंटरवर राहणार ‘वॉच’; सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे बंधनकारक

कोणता महिना किती दिवसांचा असतो हे सर्व विद्यार्थ्यांना माहिती आहे की नाही हे कळेल. याचप्रमाणे पान ११४-११५ पानावरील ‘सोडवलेले उदाहरण’ विद्यार्थ्यांना, वर्गातच स्व-अभ्यास म्हणून बघायला सांगून किती विद्यार्थ्यांना गणितात ३० ते ३५ टक्के गुण आहेत? हा प्रश्न विद्यार्थ्यांना विचारता येईल. २० गुणांच्या चाचणीत पास होण्यासाठी किती गुण लागतात हे विद्यार्थ्यांना सांगता येईल.

दिन विशेषाची जाणीव

पान ११८ वरील प्रश्न ५ वा. १८ किंवा १९ जूनला विद्यार्थ्यांकडून सोडवून घेता येईल. (आठवीत हा भाग झाला आहे म्हणून) नक्कीच ४० टक्के विद्यार्थ्यांना हा प्रश्न सोडवता येईल. त्याचबरोबर ‘जागतिक पर्यावरण दिन’ कधी असतो? (कोणत्या दिवशी) हेही विद्यार्थ्यांकडून जाणून घेता येईल.

mathematics
Pune Water Supply : पेठांमधील पाणीपुरवठा विस्कळित; तीन दिवसांत पाण्याचे वेळापत्रक कोलमडले

ज्ञाताकडून अज्ञाताकडे

‘संच’ या अपरिचित प्रकरणापेक्षा ‘सांख्यिकी’ प्रकरण शिकत असताना, विद्यार्थी त्यात रमतात, हे शिकवत असताना प्रत्यक्ष अनुभवले आहे. शिवाय या प्रकरणात क्लिष्टता नाही. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास येतो. ‘निर्देशक भूमिती’मधील पान ८८ ते ९३ एवढाच भाग, पाहिजे तर जून-जुलैमध्ये घ्यावा.(प्रकरण १ ची सुरवात करण्यापेक्षा)

महत्त्वाचे

पहिल्या सत्र परीक्षेत कमी गुण मिळाल्याने दुसऱ्या सत्रात नोव्हेंबरपासून बऱ्याच विद्यार्थी व पालकांना टेन्शन येते. ते टाळण्यासाठीच जूनपासून सर्व विद्यार्थी अभ्यासाला लागावेत, हाच या लेखाचा हेतू!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.