सुप्रिया सुळेंनी का घेतली ‘सारथी’ कार्यालयाची भेट

Supriya-Sule
Supriya-Sule
Updated on

पुणे - राजर्षी शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेबाबत निर्माण झालेल्या प्रश्‍नांसंदर्भात (सारथी) राज्य सरकारकडे पाठपुरावा करू. यासंबंधी जारी करण्यात आलेल्या आदेशामुळे तरुण विद्यार्थ्यांचे भवितव्य अधांतरी आहे. त्यांना अडचणी निर्माण होणार नाहीत, यासंबंधी राज्याच्या मुख्य सचिवांबरोबर चर्चा करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

‘सारथी’वर निर्बंध लादल्याच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी आज ‘सारथी’ला भेट दिली. तेथे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी आणि या संस्थेच्या कर्मचाऱ्यांबरोबर चर्चा केली. त्यांचे प्रश्‍नही त्यांनी समजून घेतले. ‘सारथी’ वाचविण्याचे प्रयत्न आपण करावेत, असे आवाहन विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी केले. सारथीच्या माध्यमातून मराठा आणि कुणबी समाजाच्या तरुणांना आशेचा किरण दिसला आहे.

 या माध्यमातून अनेक योजना तरुणांसाठी राबविल्या जात आहेत. पण निर्बंध लादल्याने ‘सारथी’मार्फत मिळणारी पाठ्यवृत्ती बंद होण्याचा धोका असल्याचे विद्यार्थ्यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिले. विद्यार्थ्यांना भेटण्यापूर्वी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक डी. आर. परिहार यांची भेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.