Kasaba By-Poll Election : टिळक कुटुंबाला का डावललं? चंद्रकांत पाटील म्हणाले हा निर्णय...

Mukta tilak, chandrakant patil and devendra fadnavis
Mukta tilak, chandrakant patil and devendra fadnavis
Updated on

Kasaba-Chinchwad By Election : पुण्यातील कसबा आणि चिंचवडमध्ये होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीसाठी अखेर भाजपने उमेदवार जाहीर केले आहेत. हेमंत रासने यांना कसब्यातून भाजपकडून उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. तर चिंचवडमध्ये अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या निवडणुकीत भाजपने दिवंगत मुक्ता टिळक यांच्या कुटुंबाला डावललं आहे. यावर आता पालकमंत्री आणि भाजपनेते चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Kasaba-Chinchwad By Election news in Marathi)

Mukta tilak, chandrakant patil and devendra fadnavis
Earthquake : गुजरातच्या अमरेलीमध्ये भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

चंद्रकांत पाटील म्हणाले की, देवेंद्रजी आणि मी टिळक कुटुंबाला भेटून योग्य ते स्थान देण्यात येईल, अशाप्रकारे आश्वस्त केलं. त्यांनी देखील पक्षासोबत राहू असं म्हटलं आहे. तसेच जगताप यांच्या कुटुंबात कोणताही वाद नव्हता. लक्ष्मण जगताप यांच्या मुलाने समजदारी दाखवली. आमचं कुटुंब कोणीही तोडू शकणार नाही. ज्याला उमेदवारी मिळाले त्याच्या पाठिंशी संपूर्ण कुटंब राहिल, असं त्यांच्या मुलाने सांगितल्याचं पाटील यांनी म्हटलं.

Mukta tilak, chandrakant patil and devendra fadnavis
Iqbal singh Chahal : बीएमसीचं बजेट सादर करणारे आयुक्त इक्बाल सिंह चहल कोण आहेत?

टिळक कुटुंबाला डावलण्यात आलं का, या प्रश्नावर पाटील म्हणाले की, टिळक कुटुंबाशी चर्चा करून ही निवडणूक जिंकणं किती महत्त्वाचं आहे, हे पटवून दिलं. त्यावर शैलेंद्र टिळक आणि कुणालला महाराष्ट्राचा प्रवक्ता म्हणून घोषित केलं आहे. टिळक कुटुंबाच्या पाठिशी आम्ही आहोत, असंही पाटील यांनी म्हटलं.

आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे कसबा विधानसभा मतदार संघात पोटनिवडणूक होत आहे. त्यामुळे टिळक कुटुंबातील सदस्यालाच उमेदवारी मिळेल अशी चर्चा होती. मात्र भाजपने त्यांच्या जागी हेमंत रासने यांनी उमेदवारी दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()