पुणे - चारित्र्यावर संशय घेऊन डोक्यात कुऱ्हाडीने वार करून पत्नीचा खून केल्याची घटना बुर्केगाव (ता. हवेली) येथे घडली. या प्रकरणी लोणीकंद पोलिसांनी पतीला अटक केली आहे.
लक्ष्मी बाबासाहेब जाधव (वय-५०, रा. बुर्केगाव, ता. हवेली) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी एका महिलेने (वय २३) लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून बाबासाहेब मारुती जाधव (वय ५३) याच्याविरुद्ध रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मी जाधव यांची मुलगी आईला फोन करत होती. परंतु फोन उचलत नसल्यामुळे २३ जुलै रोजी मुलगी तिच्या पतीसह आईच्या घरी आली. त्यावेळी लक्ष्मी जाधव यांच्या डोक्यात, मानेवर आणि पाठीवर कुऱ्हाडीने वार करून खून केल्याचे आढळून आले.
या घटनेची माहिती मिळताच परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर, सहाय्यक पोलिस आयुक्त विठ्ठल दबडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सावळाराम साळगावकर, पोलिस निरीक्षक (गुन्हे) नीलेश जगदाळे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.