पुणे : शहरातील गणेशोत्सवाचा आनंद शिगेला पोचलेला असतानाच भाविकांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने आवश्यक सीसीटीव्ही देखभाल दुरुस्तीचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. दोन ते तीन पोलिस ठाणे वगळता मध्यवर्ती भागातील पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील सीसीटीव्ही देखभाल दुरुस्ती 60 टक्के झाली आहे. त्यामुळे विसर्जनापर्यंत तरी महापालिका प्रशासनाकडून सीसीटीव्ही दुरुस्तीचे काम पूर्ण होईल का ? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.